हप्ते घेतांना पोलीसांचे फोटो काढले
*सकाळचे पत्रकार चौधरी यांचेवर प्राणघातक हल्ला
नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागात असलेल्या पळसण ता.सुरगाणा येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी व तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हिरामण चौधरी यांनी यात्रेत पोलीस हप्ते घेत असतानाच फोटो काढले असता,त्याचा राग आल्याने पोलीसांनी ग्रामस्थाना सांगितले की,जर पेपरला बातमी आली तर तुमच्या गावाची बदनामी होईल,तेव्हा आता तुम्हीच काय करायचे ठरवा असे म्हणत पोलीसांनी ग्रामस्थांना पत्रकार चौधरी यांना मारहाण करण्यास भाग पाडले .
या मारहाणीत ते स्वत: व आई,पत्नी,मुले गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळतात रात्री उशिरा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी SP आरती सिंह यांचेशी फोनवर संपर्क साधून पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करणारे व त्यांना उद्युक्त करणारे पोलीस कर्मचारी यांना ताब्यात घेऊन कायदेशिर कारवाई करण्याची मागणी केली.२४ तासात हि कारवाई न झाल्यास तिव्र आंंदोलनाचा इशारा दिला.SP आरती सिंह यांनी कारवाईचे संकेत देत याप्रकरणी मी स्वत: लक्ष देण्याचे आश्वासन दिेले.
*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने या घटनेचा निषेध केला.. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे..