तरूण पत्रकारांचे ह्रदयविकाराने निधन होण्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत.आज ठाणे येथील प्रातःकाल या वृत्तपत्राचे प्रतिनिधी मनोहर रावळ यांचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी ह्रदयविकाराने निधन झाले.पत्रकारांचे तब्येतीकडे होणारे दुर्लक्ष,दगदग,धावपळ ,ताण तणाव या सर्वांचा परिणाम पत्रकारांच्या प्रकृत्तीवर होतो.या टाळण्यासाठी निमयित व्यायाम आवश्यक आहे.हे होत नसल्यानं पत्रकार वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत.पत्रकार संघटनांनी सातत्यानं पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून पत्रकारांच्या प्रकृत्तीची नियमित तपासणी होईल याची काळजी घेतली पाहिजे.मराठी पत्रकार परिषद दर वर्षी संपूर्ण राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत असते.मनोहर रावळ यांना विनम्र आदरांजली.