दिल्लीः एनडीटीव्हीवर बॅन केल्यानंतर सरकारने आसाममधील न्यूज टाइम्स आसामला देखील एक दिवस बॅनची शिक्षा ठोठावली आहे.माहिती आणि जनसंपर्क विभागाने 2 नोव्हेंबर रोजी हा आदेश काढला आहे.कार्यक्रमाबाबतची जी नियमावली आहे ती एक पेक्षा जास्त वेळ तोडल्यानं न्यूज टाइम आसामवर बंदीची कारवाई केली जात आहे.त्यामुळं एनडीटीव्ही बरोबरच न्यूज टाइम आसाम देखील येत्या 9 तारखेला दिसणार नाही.एका अल्पवयीन मुलावर झालेले अत्याचाराची क्लीप दाखवून त्या मुलाची ओळख जगाला करून दिल्याचा ठपका संबंधित चॅनलवर ठेवला गेला आहे.या वाहिनीला कारणे दाखवा नोटीस 2013 च्या ऑक्टोबरमध्ये पाठविली गेली होती.त्यावर तीन वर्षांनी आता कारवाई केली जात आहे.आता आपला नंबर कधी लागतो याची प्रतिक्षा देशातील अन्य काही चॅनल्स करीत आहेत.–