देवकांत बरुआ ही वल्ली आजच्या तरूण पिढीला माहितीअसण्याचं कारण नाही.पण आणीबाणीत आणि तत्पुर्वीच्या कालखंडात ज्या ज्या कॉग्रेसी नेत्यांनी उच्छाद मांडला होता त्यात देवकांत बरुआ हे होते.चमचेगिरीच्या सर्व सीमा पार करीत या महोदयांनी ‘इंदिरा इज इंडिया अॅन्ड इंडिया इज इंदिरा ” अशी घोषणा देत इंदिराजी देशापेक्षा मोठ्या असल्याच्या आरोळ्या दिल्या होत्या.हा अतिरेक जनतेला असहय झाला आणि नंतर इंदिराजींचा पराभव झाला.देवकांत बरूआ गायब झाले.हे सारं आठवण्याचं कारण हल्लीचे बरूआ पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना ‘सुर्याची उपमा’ देत आहेत.मोदींवर टीका केली तर ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल अशी भाषा वापरली जात आहे.हा सारा प्रकार देवकांत बरुआ टाइपचाच आहे.इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ती अशी..इंदिरा इज इंडिया अॅन्ड इंडिया इज इंदिरा ” म्हणणार्यांचे जनता जनार्दनानं पुढं काय केलं हे सर्वश्रुत आहे….