आगरी साहित्य हे अन्य साहित्यापेक्षा वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण आहे,या साहित्यातील गोडवा नवीन पिढीला समजावा यासाठी प्रय़त्न व्हायला हवेत अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
आगरी साहित्य विकास मंडळाच्यावतीनं अलिबाग नजिक चेंढरे येथे 12 व्या राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाघाटन रविवारी जयंत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कैलास पिंगळे आहेत.
आगरी समाजात प्रतिभावंत शिक्षक निर्माण झाल्याने त्यांनी आगरी साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली परंतू आगरी साहित्याचा दर्जा वाढला पाहिजे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी आगरी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.