शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केजमध्ये आमच्याच कार्यक्रमात बोलताना देशमुख हयात असेपर्यंत तरी पत्रकार संरक्षण कायदा होणार नाही अशी भविष्यवाणी केली होती.मात्र मला असं वाटत नाही.याच अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा होईल याबद्दल आता माझ्या मनात शंका नाही.तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात दिलं होतं,ते आपला शब्द पाळतील अशी माझी खात्री आहे..त्यादृष्टीनं शासकीय पातळीवर हालचाली सुरूही झालेल्या आहेत.सरकारनं पत्रकार हल्ले विषयक विधेयकाचं प्रारूप मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडं पाठविलं आहे.या ड्राफ्टमध्ये काही दुरूस्तया असतील,किंवा अभिप्राय असतील तर ते आपणास 6 मार्चपर्यंत सरकारकडं पाठवायचे आहेत.राज्यातील तमाम पत्रकारांनी हा ड्राफ्ट वाचावा आणि त्यावरच्या सूचना,हरकती समितीकडं पाठवाव्यात अशी अपेक्षा आणि विनंती आहे.समितीच्यावतीने त्या सरकारकडं पाठविल्या जातील.संभाव्य कायदा कसा होत आहे हे तमाम पत्रकारांना समजावे यासाठी हा ड्राफ्ट येथे देत आहोत.