अशोक चव्हाण यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.पेड न्यूज प्रकऱणी निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी रविवारी संपली असून 20 जूनपर्यत त्याचा निकाल अपेक्षित आहे.केंद्रीय निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत,एच.एस.ब्रम्हा,आणि एस.एन.ए झैदी यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे.