मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाल्यानंतर टप्प्याटप्पयानं प्रत्येक जिल्हयात परिषदेच्या शाखा स्थापन होत गेल्या.आरंभीच्या काळात ज्या जिल्हयात या शाखा स्थापन झाल्या त्यात रायगडचा समावेश आहे.24 मार्च 1953 रोजी मुंबईत मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन लोकसत्ताचे ह.रा.महाजनी यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं.या अधिवेशनात वृत्तपत्रांना देण्यात देण्यात येणाऱ्या जाहिरातीबाबत तत्कालिन सरकारने अवलंबिलेल्या धोरणाबाबत तीव्र नापंसती व्यक्त कऱण्यात आली होती.( – म्हणजे जाहिरातीबाबतचा सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन 53 पासूनचा आहे.त्यात आजही बदल झालेला नाही)तसा ठरावही एकमताने संमत करण्यात आला होता. या अधिवेशनासाठी विविध जिल्हयातून पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.रायगडमधूनही पत्रकार अधिवेशनासाठी उपस्थित होते.त्या काळी रायगडमधून कुलाबा समाचार,नवकृषीवल,राष्ट्रतेज यासारखी वृत्तपत्रे प्रसिध्द होत.या शिवाय बाहेरची काही वृत्तपत्रे रायगडात येत असत.त्यामुळे जिल्हयातील बहुतेक जिल्हयात पत्रकार होते.मात्र ते संघटीत नव्हते.परिषदेच्या अधिवेशनासाठी कुलाबा समाचारचे वि.वि.मंडलिक आणि नव कृषीवलचे ना.ना.पाटील अधिवेशनासाठी गेले होते.परिषदेत ज्या ठिकाणी अजून संघ स्थापन झालेले नाहीत तेथे ते त्वरित स्थापन करण्यासाठी प्रयत्न कऱण्याचे आवाहन करण्यात आले.त्यामुळे मंडलिक आणि ना.ना.पाटील यांनाही आपल्या जिल्हयात पत्रकार संघटना स्थापन झाली पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले.त्याचं प्रतिबिंब नवकृषीवलच्या 6 एप्रिल 53 च्या अग्रलेखात उमटलेलं दिसेल.कृषीवलकारंानी अधिवेशनाचा वृत्तांत तर दिलेलाच आहे त्याचबरोबर आपलं स्पष्ट मतंही नोंदविलं आहे.तसंच जिल्हयातील पत्रकारंानी संघटीत होण्याची गरजही त्यानी प्रतिपादन केलेली आहे.त्यानंतर मधले पाच-सहा वर्षे संघटना स्थापन कऱण्याच्यादृष्टीने काही हालचाल झाल्याचे दिसत नाही.मात्र 17 जून 1959च्या कुलाबा समाचारच्या अंकात एक पत्र प्रसिध्द झाले आहे.त्यात पत्रकारांच्या पुढच्या समस्या आणि संघटनात्मकबाबींवर च र्चा कऱण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येण्याबाबत आवाहन क रण्यात आले होते.त्या पत्रात म्हटले होते की,कुलाबा जिल्हयात असलेले पत्रकार,बातमीदार हे आतापर्यतच्या इतिहासात केव्हाही एकत्र जमले,व त्यांनी आपल्या व्यवसायातल्या प्रश्नांची च र्चा केली व एकमेकांचा निकट परिचय करून घेतला असं घडलेलं नाही.त्यांनी एकत्र येणं हे त्यांच्या व्यवसायाच्यादृष्टीनं जिल्हयाच्या हिताच्यादृष्टीनं आणि पत्रकाराचंी उच्च पातळी राखून समाजातील या माननीय व्यवसायाची प्रतिष्ठा राखणे या दृष्टीनं अत्यंत हितावह होईल.वरील सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही जिल्हयात असलेल्या या व्यवसायातील सर्व पत्रकार मित्रांची एक बैठक घ्यावी असे सुचवित आहो.याबाबत आपले विचार मांडल्यास आम्ही उपकृत होऊ.यानंतर बैठकीची जागा तारीख आणि वेळ सर्वांच्या सोयीनुसार ठरविण्यात येईल.तरी सदरची बैठक जुलै मकिन्यात पेण येथ घेतल्यास ते सर्वांसाठी सोयीचे ठरेल असे वाटते.हे सर्वांना मान्य होईल अशी अपेक्षा आहे.आपल्याकडून उत्तराची अपेक्षा करतो.पत्रव्यवहार संपादक राष्ट्रतेज अलिबाग या पत्त्यावर करावा असे आवाहन कऱण्यात आले होते.या पत्राच्याखाली राष्ट्रतेजचे संपादक ह.वा.महाजन,नवकृषीवलचे संचालक ना.ना.पाटील,लोकमित्रचे प्रतिनिधी ग.वा.भडकमकर आणि कुलाबा समाचारचे वि.वि.मंडलिक यांची नावं होती.
– सर्व ज्येष्ठ संपादकांनी केलेल्या या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला.त्यानुसार जिल्हयातील पत्रकारांची एक बैठक 19 जुलै 1959 रोजी दुपारी 1 वाजता पेण नगरपालिकेच्या सभागृहात झाली.या बैठकीस मार्गदर्शन कऱण्यासाठी मुंबईचे प्रतिथयश पत्रकार श्रीपाद शंकर नवरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी अपेक्षा होती.मात्र ते येऊ न शकल्यानं जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकार कुलाबा समाचारचे संपादक वि.वि.मंडलिक यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.बैठकीत जिल्हयातील थोर पत्रकार दे.भ.रामभाऊ मंडलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त कऱणारा ठराव संमत करण्यात आला होता.त्यानंतर प.रा.दाते,श्रीकृष्ण रानडे,साथी दत्ता फडके,ना.ना.पाटील,मा.के.सहस्त्रबुध्दे ,द.ना.पाटील,बाबुराव पळणीटकर,आदर्शचे ग.भा.पंडित,यांची भाषणे झाली.ना.ना.पाटील यांनी आपल्या भाषणात पत्रकार म्हणून काम करताना आपल्या आयुष्यात कोणकोणती गंडांतरं आली,आपण आयुष्यभर सत्याचा कसा पाठपुरावा केला,निर्भयपणे अनेक कुलंगडी कशी चव्हाट्यावर आणली,शेतकरी सेवा हेच कसे आपले ध्येय आहे,आणि आपण नेहमीच पिडित आणि पददलित जनतेचा कसा पक्ष घेतला याची सविस्तर माहिती आवेशपूर्ण भाषेत प्रतिपादन केली. या सभेचे वृत्त देणारा मजकूर कुलाबा समाचारच्या 22 जुलै 1959च्या अंकात प्रसिध्द करून या बैठकीत संमत झालेले ठराव आणि झालेल्या भाषणाची माहिती प्रसिध्द केली होती.एक महत्वाची गोष्ट म्हणजे अन्य ठरावाबरोबरच पत्रकारांसाठी आचारसंहिता ग्रंथित कऱण्यात आली.याचा अ र्थ पत्रकारांसाठीच्या आचारसंहितेची गरज आजच भासते आहे अस नाही तर थेट 55 वर्षांपूर्वी देखील तत्कालिन पत्र पंडितांना याची गरज भासली होती याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. – याच बैठकीत मराठी पत्रकार परिषदेच्या सूचनेप्रमाणे संघटनेचं नाव कुलाबा जिल्हा मराठी पत्रकार संघ कऱण्याचं ठरलं असावं.ही संस्था तेव्हा मराठी पत्रकार परिषदेची सलग्न असल्यानं संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे केली गेली नसावी..नंतर या संस्थेची नोंदणी केली गेली.परिषदेत किंवा बैठकीत जे ठराव संमत कऱण्यात आले होते आणि जे नि र्ण य घेतले गेले होते त्याची अंमलबजावणी घडवून आणण्यासाठी आणि पत्रकार संघाचे काम अखंडपणे सुरू राहावे यासाठी वि.वि.मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थायी समितीही नियुक्त कऱण्यात आली होती.अशा प्रकारे पत्रकार संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली.नंतर विसुभाऊ मंडलिक, प्रभाकर पाटील, हरिभाऊ महाजन यांनी आरंभीच्या काळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. नंचक मीनाक्षी पाटील, माघवराव मंडलिक ,नवीन सोष्टे,आणि आता सुप्रिया पाटील हे पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. 18 – 4-86 रोजी मीनाक्षी पाटील अध्यक्ष अघ्य़क्ष झाल्या.त्यांचा सत्कार विद्याधर गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या काळातच पत्रकार संघाची इमारत उभी राहिली.त्यानंतर 5 जानेवारी 1990 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मीनाक्षी पाटील यांनी पत्रकार उभारणीचे आपले स्वप्न साकार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.या वास्तुला रामनारायण पत्रकार भवन असे नाव देण्यात आले.पत्रकार संघाने अनेक चांगले आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत.पत्रकार संघाच्यावतीनं पत्रकारितेचं प्रशिक्षण नव्या पत्रकारांना देता यावं यासाठी मुक्त विद्यापीठाचं अभ्यासकेंद्र एस.एम.देशमुख यांच्या पुढाकारानं सुरू कऱण्यात आलं.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ हा पहिला संघ आहे की,ज्याला मुक्त विद्यापीठानं हे केंद्र दिलं होतं.त्या अगोदर केवळ शिक्षण संस्थानाच अशी केंद्र दिली जायची.मात्र एस.एम.देशमुख यांनी विद्यापीठाशी भांडून हे केंद्र अलिबागला आणलं आणि ते यशस्वी करून दाखविलं.त्यानंतर एस।एम.देशमुक यांच्या संकल्पनेतूच प्रभाकर पाटील वाचनाल्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.आज हे वाचनालय चांगलं चालू आहे.मात्र जर्नालिझमची जगभरातील सारी पुस्तकं या ग्रंथालयात असावीत ही एस.एम.देशमुख यांची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाला चांगली इमारत आहे.समुद्राच्या काठावर असलेली ही इमारत पत्रकार संघाचं वैभव आहे.गंमत अशी की,सरकारच्या कोणत्याही महेरबानीवर ही इमारत उभी नाही.सरकारनं या इमारतीसाठी जागा अ थवा नि धी दिलेला नाही.संघाने आपलय उत्पन्नाची साधनही निर्माण केलेली असल्यानं संघ आर्थिकदृष्याही सक्षम आहे.नागेश कुळकर्णी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.
एस.एम.देशमुख
( हा लेख आपणास http://www.smdeshmukh.blogspot.in/ येथून कॉपी करता येईल)