अशी असते उज्ज्वल निकम यांची फीस

    0
    920

    महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा गंभीर गुन्हे घडतात तेव्हा तेव्हा त्या प्रकरणात न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी जनतेच्यावतीने सरकारकडे केली जाते.कोपर्डीच्या प्रकरणातही सरकारवर त्यासाठी दबाब आला आणि सरकारने ती मागणी देखील मान्य केली.उज्ज्वल निकम यांनी असे अनेक खटले चालविले,गुन्हेगारांना शिक्षेपर्यन्त पोहोचविले.मात्र हे खटले चालविण्यासाठीउज्ज्वल निकम सरकारकडून किती फिस घेत असतील हा देखील कायम उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे.आज सरकारने काढलेल्या एका जीआर ने त्याबद्दलचे उत्तर मिळाले आहे.कांदिवली पोलिसात दाखल झालेल्या एका प्रकरणाची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांना सरकारने जी फिस मंजूर केली आहे त्याचा एक जीआर ( शासन निर्णय क्रमांक एसपीपी 0116/ प्र.क्र./ 22/ पोल 10 दिनांक 27 जुलै 2016 ) काढला आहे त्यानुसार निकम यांच्या फिसला खालील प्रमाणे मान्यता दिलेली आहे.
    1) परिणामकारक सुनावणी फिस 35,000 रूपये प्रतिदिन
    2) विचार विनिमय फिस 10,000 रूपये प्रतितास ( दररोज जास्तीत जास्त तीन तास )
    3) हॉटेल लॉजिंग बोर्डिंगसाठी 5,000 रूपये प्रतिदिन
    म्हणजे खटला चालू असताना उज्जवल निकम यांना पन्नास ते साठ हजार रूपये मिळतात.शी असते उज्जवल निकम यांची फिस

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here