अवजड वाहनांना  रात्री  प्रवेश बंद

0
1053

अलिबाग- गणपतीच्या काळात मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी रात्री 8 ते सकाळी 8 पर्यत बंद ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत केल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भऱणे,रूंदीकरण,चौपदरीकऱण या अनुषंगाने गणपतीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकीत भुजबळ बोलत होते.
यावेळी भुजबळ यांनी महामार्गावरी खड्डे 20 ऑगस्ट पुर्वी भरण्याच्या आणि चौपदरीकऱणाचे कामही वेगाने पुर्ण कऱण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
गणपतीच्या काळात दक्षिण भारतातून येणारी वाहतूक कोल्हापूरमार्गे वळविण्यात यावी आणि रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना थांबण्यासाठी वाहनतळ निर्माण करावेत असेही सांगण्यात आले.या बैठकीस नारायण राणे आणि कोकणातील अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here