बकरी इदच्या निमित्तानं इजिप्तचे अध्यक्ष अव्देल फताह अल सिसी यांनी अल जझिरा वाहिनीच्या पत्रकाराची तुरुंगातून मुक्तता केली आहे.मोहम्मद फहामी असे त्याचे नाव आहे.तो इजिप्शियन वंशाचा कॅनडियन नागरिक आहे.मुस्लिम ब्रदरहूड या बंदी घातलेल्या संघटनेत सामिल होऊन राष्ट्रीय सुरक्षेला बाधक अशा खोटया बातम्या पसरवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली होती.