लोकशाहीत मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि हक्कही आहे याची जाणीव ठेऊन नागरिकांनी मतदानासाठी सज्ज व्हावे असे आवाहन निवडणूक आयोगाचे केंद्रीय निरिक्षक टी.व्ही.के.रेड्डी य़ांनी आज अलिबाग येथे केले.
अलिबाग येथील जनरल अरूणकुमार वैद्य हायस्कूलच्या सभागृहात आज मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी रेड्डी बोलत होते कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुमंत भांगे पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे आणि इतर वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगले मतदान होते,त्यामुळे मतदानापासून दूर राहणाऱ्या मतदारांना मार्गदर्शन करून शंभर टक्के मतदानाचे आव्हान पेलायला हवे असे आवाहन करतानाच रेड्डी यांनी मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला पवित्र हक्क बजवावा असेही उपस्थितांना आवाहन केले.