अलिबाग कात टाकतंय

0
873

रायगडच्या राजधानीचे शहर असलेले अलिबाग आता कात टाकत असून लवकरच अलिबागमध्ये सात मजली टॉवर्स उभे राहिलेली आपणास बघायला मिळणार आहेत.तसेच शहरातील अरूंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी देखील दूर होणार असून 9 मीटरचे रूंद रस्ते दिसू लागतील त्यामुळे अलिबागच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.येत्या काही दिवसात अलिबाग रेल्वेने देखील जोडले जाणार असल्याने अलिबागचा आता चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे.
रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्याने अलिबाग शहराची लोकसंख्या झपाट्‌याने वाढत आहे.हाउसिंग प्रकल्पही वाढत आङेत,मात्र प्रोजक्टसाठी नव्या जागाच उपलब्ध ऩसल्याने सरकारने एफएसआय़ वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांना आता सात मजली इमारती बांधता येणार आहेत.मात्र नगरपालिकेने अशा टॉवर्सना परवानगी देताना 9 मिटरचे रस्ते आणि सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना कराव्यात अशी अट घालण्यात आली आहे.
अलिबाग शहर आतापर्यत रेल्वे पासून दूर होते.अलिबागनजिक थळ येथे असलेल्या आऱसीएफ कंपनीतील उत्पादनाची ने आण कऱण्यासाठी थळपर्यत मालगाडी येत असते.मालगाडीच्या या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करावी अशी अलिबागकरांची जुनी मागणी होती.त्याबाबत आता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घातले असून थळ येथे रेल्व स्थानक उभारून तेथून अलिबाग-मुंबई प्रवासी वाहतूक सुरू कऱण्याची योजना आहे.दुसऱ्या बाजुला दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीयल कॉऱिडॉरच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या दिघी बंदर ते मुंबई असाही रेल्वे मार्ग टाकला जाणार असून या मार्गाला अलिबाग-मुरूड जोडता येईल काय यादृष्टीने सर्वेक्षण केले जात आहे.त्यामुळे येत्या 2021 पर्यत अलिबाग शहराचा चेहरा-मोहराच बदलून जाणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here