चक्रीवादाळाचे धोके निवारण कार्यक्रमांतर्गत अलिबाग परिसरातील विद्युत वाहिन्या भुमीगत कऱण्याचे काम पुढील दोन महिन्यात सुरू होत असल्याची माहिती अलिबाग महावितरणने दिली आहे.84 कोटींच्या या प्रकल्पास जागतिक बॅकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे.आपत्ती धोके निवारण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे.
किनारपट्टी भागात पूर,वारे,वादळं,अतिवृष्टीचा धोका अन्य भागाच्या तुलनेत अधिक असतो.अशा आपत्तीची तीव्रता कमी करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.पावसाळ्यात वादळामुळे सातत्यानं वीज पुरवाठ खंडीत होतो.तारा तुटून अपघात होतात.त्यातुनी जिवित आणि मालमत्तेचं नुकसान होतं हे सारं टाळण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.तारा भूमिगत टाकल्यानं वीज चोरी,वीज गळतीची समस्याही दूर होणार आहे.अलिबाग परिसरातील 18 हजार ग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे