रायगड जिल्हायातील माणगाव येथील पत्रकार कमलाकर ओहाळ यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रायगड प्रेस क्लब,रायगड जिल्हा मराठी पत्रक ार संघ आणि रायगड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने काल अलिबाग येथील एस.पी.कार्यालयासमोर जोरदार निदर्शने कऱण्यात आली.एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाल्यानंतर पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची भेट घेऊन जिल्हयातील पत्रकारांच्या सुरक्षेबाबत त्यांच्याशी चर्चा केली.या हल्लयातील आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे.पत्रकारांच्या या आंदोलनात शंभरावर पत्रकारांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.