जागतिक एड्स नियंत्रण पंधरवाडयास जनजागृती रॅलीने आज अलिबागेत प्रारंभ झाला.पंधरवाडयाच्या निमित्तानं ज्लिहयात जनजागृती आणि एड्स प्रतिबंधक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
जनजागृतीपर रॅलीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी,जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ कऱण्यात आला.शहरातील महावीर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बालाजी नाका मार्गे जिल्हा सामांन्य रूग्णालयाच्या प्रागंणात रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीत शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येनं सहभागी झाले होते..-