अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून गुरुवार दि 23 मे रोजी मारहाण व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एक होत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि 27 मे रोजी सकाळी 10 .30 वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर मोर्चाची सुरुवात पत्रकार भवन, समुद्र किनारा, अलिबाग येथून करण्यात येणार आहे.
पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक -कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे या मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचेल.
दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन घेऊन पत्रकारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेईल. त्यानंतर मोर्चा चा समारोप होईल.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या मोर्चात सहभागी होत आपल्या एकजुटीचे दर्शन दाखवावे ही विनंती या मोर्चाला मराठीी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस पाठिंब दिला आहे..
आपला विनीत
प्रकाश सोनवडेकर