लिबागमध्ये सेक्स रॅकेट पाच जणांना 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी 
अलिबागः पर्यटनाच्या नावाखाली मुलींना पुणे येथून अलिबागला आणून सेक्स रॅकेट चालविणार्‍या पाच जणांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने रविवारी अटक केली.आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलिसांनी सापळा रचून आणि बनावट गिर्‍हाईक पाठवून खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी अलिबागमधील मध्यवस्तीत असलेल्या तीन हॉटेलवर छापे मारले.त्यावेळी तळेगाव दाभाडे येथील दोन महिला दलाल,दोन वाहनचालक,आणि अलिबागमधील तिघा हॉटेल व्यावसायिकांसह 11 पिडित मुली , महिलांना ताब्यात घेतले होते.त्यानंतर त्यातील पाच जणांना अटक करून त्यांना न्यायालयसमोर हजर करण्यात आले.अलिबागसारख्या शांत आणि सुसंस्कृत शहरात सेक्स रॅकेट उघडकीस आल्याने अलिबागमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here