चक्रीवादळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तीपासू शहराचं आणि परिसराचं रक्षण व्हावं यासाठी चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांगर्तगत अलिबाग शहर चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमीगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्यात येत  आहे.यामुळं चक्रीवादळामुळं विजेचे खाब उन्मळून पडणे,तारा तुटणे,तुटलेल्या तारांतून विद्युत प्रवाह सुरू राहून वित्त आणि मनुष्यहानी होणे आदि घटनांना पायबंद घालता येणार आहे.विद्युत तारा भूमिगत होणार असल्यानं शहराचं संभाव्य नेसर्गिक  धोक्यांपासून रक्षण तर होणार आहेच त्याचबरोबर शहराच्या सौदर्यात देखील भर पडणार असल्याची माहिती राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक चर्चासत्रात  दरम्यान दिली .शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र नुकतंच पार पडलं.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने देशातील संभाव्य 13 चक्रीवादळ प्रवण भागात हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अलिबागची निवड कऱण्यात आली आहे.79 कोटी 2 लाख रूपयांच्या या प्रकल्पांतर्गत अलिबाग,चेंढरे आणि वरसोलीचे भूमिगत केबलिंग केले जाणार आहे.शहरातील 22 केव्ही स्विचिंग स्टेशनचंही नूतनीकरण केलं जाणार आहे.27 किलो मिटर लांबीच्या उच्चदाब आणि 45 किलो मिटर लांबीच्या लधुदाब वाहिन्या जमिनीखालून टाकल्या जाणार आहेत.अलिबागनजिकच्या 17.9 चौरस किलो मिटर परिसरात हा प्रकल्प राबविला जाणार आहे.केबलसाठी जमिनीखाली 0.8 ते 1.2 मिटर खोल खड्डा खोदून त्यातून केबल टाकले जाणार असल्याने हा प्रकल्प पूर्णतः निर्धोक असेल असे सांगितले जात आहे.या प्रकल्पामुळं भविष्यात लटकणार्‍या,उगडया तारा दिसणार तर नाहीतच त्याचबरोबर पावसाळ्यात विजेच्या तारा तुटल्यानं सातत्यानं खंडित होणार्‍या विद्युत पुरवठ्यापासूनही अलिबागकरांची सुटका होणार असल्यानं अलिबागकरांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

6.66 GB (44%) of 15 GB used
Last account activity: 36 minutes ago

Details

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here