अलिबागनजिकच्या समुद्रात तिघांचा बुडून अंत
अलिबागः अलिबागनजिकच्या नागाव येथील बिचवर कोपरखैरणे येथील 3 तरूणांचा बुडून दुदैर्वी अंत झाल्याची घटना आज घडली आहे.त्यातील दोघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध पोलीस आणि स्थानिक मच्छिमार घेत आहेत.
कोपरखैरणे येथील तेरा जण काल रात्री एका मिनिडोअरमधून नागावला आले.रात्री समुद्र खवळलेला असताना आणि स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता यातील काही तरूण समुद्रात उतरले आणि त्यातील तिघेजण बघता बघता पाण्यात बेपत्ता झाले.चैतन्य किरण सुळे,आशिष मिश्रा आणि सुहाद सिद्दगी अशी या तरूणांची नावे असून हे तिघेही वीस ते चोवीस या वयोगटातील आहेत.आशिष आणि सुहादचा मृतदेह मिळाला असून चैतन्यच्या मृतदेङाचा शोध घेतला जात असल्याचे अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले..
Click here to Reply, Reply to all, or Forward
|