अलिबागनजिक भायमळा येथील क्रंाती फायर वर्क्स या फटाके बनविण्याच्या कारखान्याला गुरूवारी दुपारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या आता 10 झाली आहे.स्फोटात 20 जण जखमी झाले आहे. त्यातील 9 गंभीर जखमींना मुंबईस हालविण्यात आले असून इतरांवर अलिबागच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
स्फोट झाल्यानंतर कारखान्यास लागलेली आग एवढी भीषण होती की,आगीचे गोळे दोन किलो मीटर अंतरावरील गवताळ डोंगरावर गोळे पडल्याने तेथेही आग लागली.शेजारच्या राजधानी कारखान्याबाहेर असलेला कच्चा माल देखील या आगीत जळून खाक झाली.साळाव येथील सुरेश बोबडे हा कारखान्याचा चालक असून त्याला रात्री उशिरापर्यत अटक करण्यात आली नव्हती.
क्रांती काऱखान्यात 69 कामगार काम करतात.मात्र आज महाशिवरात्र असल्याने 34 कामगारच कामावर हजर होते.कारखान्यात 80 टक्के कामगार बिहारचे असून वीस टक्के कामगार स्थानिक होते.कारखान्यात सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतेच उपाय योजलेले नसल्याचे ग्रामस्थांनी सागितले.कारखान्याच्या जवळूनच गॅस पाईप लाईन जाते असे असताना कारखान्यास परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.