पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा आणि पत्रकारांसाठी पन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज रायगड जिल्हयातील पत्रकारांनी अलिबाग येथे जिल्हा माहिती कार्यालयासमोर उग्र स्वरूपाची निदर्शने केली.नतर जिल्हा माहिती अधिकारी सुहास नेवासकर यांना पत्रकारांच्यावतीने एक निवेदन देण्यात आले.या निवेदनात अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठन करावे,पत्रकारांसाठी विमा योजना लागू करावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी आदिंनी आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलनात शंभरावर पत्रकार सहभागी झाले होते.