मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात अमृतकलश नावाची स्मरणिका प्रकाशित कऱण्यात येणार आहे.श्रीराम कुमठेकर हे स्मरणिकेचं काम पाहात आहेत.परिषदेची वाटचाल,पत्रकार संरक्षण कायद्यासाठी परिषदेची लढाई,सरकारच्या जाहिरात धोरणाबाबतचे परिषदेचे आक्षेप,पुणे जिल्हयातील पत्रकारितेची वाटचाल या संबंधिचा मजकूर स्मरणिकेत असणार आहे.स्मरणिकेसाठी थोडी आयी झालीय पण स्मरणिका चांगली व्हावी यासाठी स्मरणिका समिती प्रयत्नशील आहे.या स्मरणिकेचं प्रकाशन उद्घाटन कायर्क्रमात होणार असून स्मरणिका आज छापायला जाईल.ही स्मरणिका प्रत्येकाकडं असावी यासाठी प्रत्येकानं जाताना स्मरणिका बरोबर घेऊन जावी.परिषदेला ७५ वषेर् झाली आहेत.त्यामुळं अमृत कलश असं स्मरणिकेचं नाव राहणार असून दवेर्श पालकर यांनी स्मरणिकेचं मुखपृष्ठ तयार केलं आहे.अंकाची मांडणी सौ.सुतार यांनी केली आहे.