दिल्लीतील सत्ता सोडल्यानंतर मोकळे झालेले अरविंद केजरीवाल आता देशभरात भ्रष्टाचार विरोधी रान पेटविणार आहेत.23 फेब्रुवारी रोजी हरियाणातून आणि 2 मार्च रोजी युपीतून केजरीवाल मोहिमेची सुरूवात करणार आहेत.योगेद्र यादव यांनी आज ही घोषणा केली.
अभी तो शीला हारी है,अब मोदी की बारी है. अशा घोषणा देणाऱ्या आपने आता आपले लक्ष्य नरेंद्र मोदी केले असल्याचे संकेत मिळत आहेत.अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.