मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेथे जातील तेथील पत्रकार त्यांना पत्रकारांच्या समस्यांबाबत प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.आज नांदेडमध्ये गोपाळ देशपांडे यांनी ‘सरकार ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांकडं नकारात्मक भूमिकेतून पहात असल्याचा’ थेट आरोप केला.पत्रकार पेन्शन योजनेतील जाचक अटींमुळंं शहरी भागातील मुठभर पत्रकारांनाच याचा लाभ मिळाल्याचेही गोपाळ देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याचे निवेदन संघटनेच्यावतीने द्यावे’ असे सांगितले तसेच पत्रकार सन्मान योजनेतील अटी शिथिल करण्यात येतील असेही आश्वासन दिले÷या अगोदर बीडमध्ये अध्यक्ष सुभाष चौरे यांच्या नेतृत्वाखील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं.काल परभणीतही विनोद कापसीकर आणि राजू हततेकर यांनी पत्रकार सन्मान योजनेचा विषय उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना त्यावर उत्तर द्यायला भाग पाडले.आज मुख्यमंत्री लातूरमध्ये आहेत.परवा सोलापुरात आहेत.दोन्ही जिल्हयातील पत्रकारानी देखील आपल्या प्रश्नांकंडं मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून ठोस भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.
आपले प्रश्न उपस्थित करणार्या सर्व पत्रकारांचे अभिनंदन