बोलताना जिभेला हाड नसल्यासारखं बोलायचं अन प्रकरण अंगलट आलं की,त्याचं खापर पत्रकारांवर फोडून मोकळं व्हायचं ही आता आपल्या देशातील रित झाली आहे.अबू आझमी याच पंथातले.मध्यंतरी महिलांच्या बाबतीत त्यांनी तारे तोडले होते.त्यावर महिला आयोगानं त्याना नोटीस बजावली आणि आयोगासमोर उपस्थित राहून आपले म्हणणे माडण्याचे फर्मान आयोगानं अबू आझमी यांना सोडलं होतं.त्याप्रमाणं आझमी काल आयोगासमोर तर हजर झाले पण त्यांनी आपल्या बाष्कळ बडबडीचे खापर माध्यमांवर फोडले.महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांच्यासमोर आपली पैरवी करताना ते म्हणाले, “संबंधित वृत्तपत्राच्या पत्रकाराने आपले म्हणणे अर्धवट आणि चुकीच्या पध्दतीनं प्रकाशित केले .आपण विवाहपूर्व लैगिक संबंध ठेवणा़ऱ्या महिेलेस फाशीची शिक्षा देण्याची तरतूद इस्लामिक कायद्यात ( शरियत) आहे असा संदर्भ दिला होता.विवाहा शिवाय लैगिक संबंध ठेवणाऱ्या महिलेस फाशी द्यावी असे आपण म्हटले नव्हते.”
खरं म्हणजे अबू आझमी काय बोलले हे जगानं पाहिलं होत,प्रकरण अंगवार शेकणार असं दिसताच त्यांनी माध्यमांवर सारं खापर डोडलं आहे.