मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्यास संबंधीत बांधकाम ठेकेदारास जबाबदार धरून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन् दाखल कऱण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिलाआहे.त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनाआदेश देण्यात आल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि रस्त्य्यांच्या अपुर्या कामांमुळे महामार्गावरजीवघेणी परिस्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे अपघात आणि त्यात होणार्या मृत्यूची संख्या वाढत आहे.ही बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनासआणून दिल्यानंतर त्यांनी वरील महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.