मुूंूबई -पुणे एक्स्प्रेस वे वर काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रायगड जिल्हयाच्या उरण तालुक्यातील तीन तरूणींचा दुदैवी अंत झाला असून अपघातात 2 तरूण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना पुण्याच्या लोकमान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुण्याहून उरणकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचा पुणे जिल्हयातील उर्से टोलनाक्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्तयाच्या कडेच्या खड्यात जाऊन कोसळली.मध्यरात्री बाराच्या सुमारासा हा अपघात झाला अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत.हे सर्व उरण तालुक्यातील असल्याने उरण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.