शेेतकरी कामगार पक्षाने रायगड आणि मावळ लोकसभा मत दार संघासाठीचे आपले उमेदवार काल पेण येथील सभेत जाहीर केलेेत. – रायगडमधून चिपळूणचे रमेश कदम शेकापचे उमेदवार असतील . मावळमधून लक्ष्मण जगताप हे शेकापच्या तिकिटावर लढणार आहेत.रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप हे दोघेही राष्ट्रवादीची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत.हा केवळ एक योगायोग आहे असं कोणाला वाटत असेल तर ते हजार टक्के चुकीचं आहे.हा .योगायोग नसून ते ठरवून आणलेला योग आहे. त्यामागे शिवसेनेला धोबीपछाड देण्याबरोबरच राष्ट्रवादीशी हातमिळविणी कऱण्याचीही शेकापची सुप्त योजना आहे.शेकापला खरोखरच लोकसभा गंभीरपणे लढवायची असती तर त्यांनी जिल्हयातीलच दोन प्रबळ नेते निवडणुकीच्या मैदानात उतरविले असते.शेकापकडे स्वतः जयंत पाटील आहेत,विवेक पाटील आहेत,मीनाक्षी पाटील आहेत आणि गेला बाजार पंडित पाटील पण आहेत.यांच्या पैकी कोणालाही शेकापने मैदानात उतरविले असते तर त्यांनी नक्कीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टक्कर दिली असती.2004च्या निवडणुकीत विवेक पाटील यांना अडिच लाखांच्यावर मतं पडली होती.त्या अगोदरही अनेकदा शेकापने रायगडची जागा जिंकली होती.अशा स्थितीत स्थानिक उमेदवार असता तर तो किमान रेसमध्ये तरी आला असता .शेकापने दोन्ही उमेदवार बाहेरचे दिले आहेत.रमेश कदम हे तळ कोकणातले राष्ट्रवादीचे नेते होते.त्यांना रायगडात कोणी ओळखत नाही.त्यामुळंच त्यांचं नाव जेव्हा जयंत पाटील यांनी जाहीर केलं तेव्हा हे रमेश कदम कोण असा प्रश्न शेकापचे कार्यकर्ते परस्परांना विचारत होते. गुहागर आणि दापोलीमध्ये रमेश कदम यांचा प्रभाव आहे असं म्हणावं तर तसंही नाही.तरीही शेकापने जर त्यांना उमेदवारी दिली असेल तर पाणी कुठं तरी मुरतंय हे उघडंच आहे.एक प्रकारे रमेश कदम हे शेकापचे डमी उमेदवार आहेत.शेकापची शिवसेनेकडं जाणारी मतं खाऊन मत विभाजनाचे काम रमेश कदम करणार आहेत.याचा अप्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनाच होणार आहे.सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांचं विळ्याभोपळ्याचं नात सर्वश्रुत असलं तरी राजकीय गरज लक्षात घेऊन हे दोन्ही नेते अनेकदा एकत्रही आलेेले आहेत हे रायगडच्या जनतेला नक्कीच माहिती आहे.सुनील तटकरे यांना अप्रत्यक्ष मदतीच्या बदल्यात शेकापला रायगड जिल्हा परिषदेची सत्ता आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद हवे आहे.जिल्हा परिषदेत सध्या शेकाप,शिवसेना,रिपाई अशी युती असून रिपाईच्या कविता गायकवाड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत.त्यांची अडिच वर्षांची टर्म आता संपत आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद पुढील काळात खुल्या किंवा ओबीसीसाठी राखीव गटाकडे आले तर त्यावर पाटील कुटुंबाचा वारस बसविण्याची योजना आहे.शिवसेनेबरोबर राहिले तर हे शक्य होणार नाही.कारण शिवसेनेला अध्यक्षपद हवे आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादीशी सौदाकरून जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविले जावू शकते.शिवसेनेबरोबरची पाच वर्षांची युती तोडण्याची घोषणा कऱण्यामागे शेकापचे हेच राजकारण आहे.शिवसेनेबरोबर राहून आपल्याला अपेक्षित लाभ झाला नाही किंवा होत नाही हे लक्षात आल्यानंतर शेकापने आता राष्ट्रवादी,मनसे आणि भाजपमधील विनोद तावडेंशी मैत्री करायला सुरूवात केली आहे.विधान परिषद निवडणूक राहूल नार्वेकरांच्या माघारीने बिनविरोध झाली म्हणून ठिक आहे असे झाले नसते तर शेकापची मतं विनोद तावडे याना मिळणार होती.म्हणजे शेकापनेही अनेक ऑप्सन खुले ठेवत आपले राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे.लोकसभेसाठी आपला उमेदवार उभा करून सुनील तटकरे यांच्या विजयाची सोय शेकापने केली आहे.त्यातून जिल्हा परिषदेची सत्ता तर मिळेलच त्याच बरोबर आपला प्रतिस्पर्धी असलेले सुनील तटकरे दिल्लीला गेल्याने त्यांची जिल्हयावरची पकडही कमी होईल.त्याचा फायदा शेकापला होईल असं जयंत पाटील याचं अ नुमान आहे.रमेश कदम यांच्या उमेदवारीला यापेक्षा वेगळा अ र्थ नक्कीच नाही.
म ावळ मधून शेकापने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.जगताप अगोदर अपक्ष म्हणून लढणार होते.ते आता लाल बावटा खांद्यावर घेऊऩ प्रचार करतील.जगताप हे अजित पवार यांचे खास अनुयायी आहेत.असे असतानाही आणि दादांच्या विरोधात जात ते राष्ट्रवादीतून बाहेर पडतात काय आणि राष्ट्रवादीशी चार हात करण्याची भाषा करतात काय ही गोष्ट हजम होण्यासारखी नाही.आज बातम्या अशा आल्या आहेत की,मावळमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही.पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे.तिथं जर दादांना उमेवदवार मिळणार ऩसेल तर दादांनी राजकीय सन्यासच घेण्याची गरज आहे असं म्हणता येईल.वस्तुस्थिती तशी नाही.दादांना मावळमध्ये बळीचा बकरा हवा आहे.तो व्हायला कोणी तयार नाही.कारण जगताप हे शेकापच्या तिकिटावर लढणार असले तरी ते खऱ्या अर्थाने अजित पवार यांचे उमेदवार आहेत हे साऱ्या मावळाला माहित आहे.
– काल लक्ष्मण जगताप यांनी ते दाखवूनही दिलं.काल शेकापच्या पेण येथील मेळाव्यास लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ़अनेक नगरसेवकही हजर होते.पेणची सभा संपवून आलेली ही मंडळी नंतर अजित पवार यांच्या बैठकीसही गेली.ति थं अजित पवार यांनी जगताप यांच्यावर टीका केलेली नाही हे वास्तव साऱ्यांच्याच लक्षात आले आहे.मावळमध्ये अजित पवारांची अडचण अशी आहे की,मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार अजून तेथील जनता विसरलेली नाही. पिंपरी-चिंचवडमधील अवैद्य ब ांधकामाबाबत माजी आयुक्त श्रीकर परदेशी यांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादीच्या गळ्यातील हड्डी बनली आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवार उभं करणं ऱाष्ट्रवादीली परवडणारं नाही.त्यामुळं अगोदर जगताप यांनी अपक्ष उभं राहायचं असं ठरलं होतं.आता शेकापनं मदतीचा हात पुढं केल्यानं शेकापचा लाल टिळा जगतापांनी आपल्या कपाळावर लावला आहे.उरण-पनवेलमध्ये शेकापची लाख -सव्वा लाख मतं आहेत.ती आणि पिंपरी चिंचवडमधील काही मतं मिळवून आपण विजयी होऊ शकतो असं जगताप याचं गणित आहे.बेकायदेशीर बांधकाम पाडली गेल्याचं भांडवल करीत ते दुखावलेल्या लोकांना कुरवाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.जी मतं राष्ट्रवादीला मिळाली नसती ती जगताप यांना मिळतील अशी आशा त्यांना आहे.मात्र राष्ट्रवादीनं जर उमेदवार दिला नाही तर पक्षाची नाचक्की होईल म्हणून शिरूर प्रमाणेच राष्ट्रवादी मावळमध्ये देखील पडण्यासाठी उमेदवार देणार आहे.लक्ष्मण जगताप निवडून आले तर त्यांना स्वगृही येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.कारण ते विजयी झालेच तर ते शेकापचे एकमेव खासदार असतील.अशा स्थितीत पक्षांतर बंदी कायदा त्यांना आडवा येत नाही.ते आपली खासदारकी शाबूत ठेवत राष्ट्रवादीत परतू शकतात.पिंपरी-चिचवडमध्ये ज्या पक्षाचं नावही कोणाला माहित नाही त्यापक्षाचे खासदार म्हणून मिरवण्यात जगताप यांना काही स्वारस्य असणार नाही.शिवाय शेकापमधील वातावरण आजपर्यत जी बाहेरची मंडळी शेकापत आली त्यांच्यापैकी कोणालाच रूचलेलं नाही.मोठी उमेद घेऊन शेकापत आलेले कर्नल सुधार सावंत यांच्यापासून अनेकजण वर्ष सहा महिन्यातच पक्षातून बाहेर पडले.कारण शेकाप हा एळाद्या प्रयव्हेट लिमिटेड कंपनी साराखा चालविला जातो हे ति थं गेल्यानंतर काही दिवसातच लोकांच्या लक्षात येते.रायगडातील असून रामशेठ ठाकूरही त्याला अपवाद ठरले नाहीत.त्यामुळं निवडूण आले काय किंवा न आले काय जगताप शेकापमध्ये रमू शकत नाहीत ते फार तर विधानसभेपर्यत शेकापमध्ये थांबतील नंतर ते स्वगृही परततील हे वास्तव आहे.
– प्रश्न पुन्हा तोच राहतो की,शेकापनं मग जगताप यांना का उमेदवारी दिली.दोन कारणं आहेत,शेकापचा स्थानिक कोणीही नेता लोकसभेच्या भानगडीत पडायला तयार नव्हता.जगताप शेकापला आयतेच उमेदवार मिळाले.त्यांच्यामुळं शेकापचं नाव मावळात माहित होईल हा एक भाग झाला आणि दुसरा शेकापची शिवसेनेकडे जाणारी मतं जगतापांच्या पारड्यात पडतील आणि शिवसेनेच्या उमेदवाराला परस्पर धोबीपछाड मिळेल त्यानं राज ठाक रेही खूष होतील आणि जातीयवादी पक्षाबरोबर शेकापनं घरोबा केल्याचा जो शिक्का शेकापच्या माथी बसलेला आहे तो काही काळासाठी तरी दूर होईल अशी ही योजना आहे.रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप यांची उमेवारी ही ठरवून केलेली आहे आणि त्याला जिल्हा परिषदेच्या राजकारणाची एक किनार आहे.परंतू मला नाही वाटत की,विधानसभेसाठी याचा शेकापला फार काही उपयोग होईल.कारण रायगडातील विधान सभेच्या सातही जागा शेकाप लढवत असतो.शिवाय आज तरी राष्ट्रवादी आणि कॉग्रेसची आघाडी असल्यानं राष्ट्रवादी शेकापला मदत करेल असे दिसत नाही.एक खऱं की,राष्ट्रवादील शेकाप पेक्षा जिल्हयातील कॉंग्रेसचीच नेहमी भिती वाटत आलेली आहे.त्यामुळं कॉग्रेसचे उमेदवारांना आस्मान दाखवताना शेकापला मदत होईल अशी भूमिका राष्ट्रवादीने पेण आणि अन्यत्र घेतल्याचे दिसेल.परंतू लोकसभेनंतर हे सारं होईलच असं नाही.शिवाय राजकारणात संधी आणि स्वार्थ हे घटक महत्वाचे असल्याने शब्दाला ति थं कोणी विचारत नाही.त्यामुळं त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार नि र्णय घेतले जातात.हे अनेकदा रायगडात तरी दिसुन आलं आहे.जिल्हा परिषदेत मात्र नजिकच्या काळात शेकाप आणि राष्ट्रवादी युती नक्तीच होईल.हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर सत्तचं गणितही सुटू शकते.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीलाही हवी आहे.त्यामुळं शेकापचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष अशी नवी युती रायगड जिल्हा परिषदेत येऊ शकते.राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही सत्तेत भागीदारीसाठी उत्सुक आहेत.शिवाय आज शेकापशी अप्रत्यक्ष का होईना युती केल्याने राष्ट्रवादीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील जे नेते नाराज आहेत त्यांना जिल्हा परिषदेतील सत्तेचा वाटा देऊन शांत कऱण्याची खेळी देखील खेळली जाऊ शकते.एक मात्र खरे की,शेकापचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादीचे अनेक कार्यकेर्त शेकापच्या विरोधात लढत असतात.ही लढाई अनेकदा रक्तरंजीतही होते.मात्र स्वार्थासाठी दोन्ही कडचे वरिष्ठ नेते खालच्या फळीवरील नेत्यांना वाऱ्यावर सोडतात.सध्या रायगडात हेच दिसतंय.म्हणून दोन्ही पक्षात मोठी नाराजी आहे.अर्थात त्याची पर्वा कऱण्याचे कोणालाच कारण वाटत नाही…
एस.एम.देशमुख