मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या राज्यातील अनेक जिल्हयात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.यातील काही जिल्हयात अनेकव वर्षे निवडणुकाच झालेल्या नव्हत्या.अशा काही जिल्हयात परिषदेने अस्थाई समित्या नेमून त्यांच्या नेतृतखाली निवडणुक प्रक्रिया सुरू केली आहे.रत्नागिरीमध्ये गेली वीस वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत .तेथील अनेक पत्रकारांनी परिषदेकडे तक्रारी केल्यानंतर ज्षेष्ठ पत्रकार अभिजित हेगशेटे यांच्या नेतृत्वाखाली तेथे अस्थाई समिती नियुक्त केली गेली.या समितीने धनश्री पालांडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. परिषदेच्यावतीने निरिक्षक म्हणून शरद काटकर काम पाहात आहेत.नाशिकमध्ये परिषदेच्यावतीने निरिक्षक म्हणून बाळासाहेब ढसाळ आणि सुनील वाळूंज यांची नेमणूक करण्यात आली असून शशिकांत पगारे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.अशाच पध्दतीनं निवडणुका अकोल्यातही संपन्न झाल्या .तेथे मीरसाहेब यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.नंदूरबारमध्ये अटीतटीच्या निवडणुकीत योगेंद्र डोरकर अध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत.परभणीत अशोक कुटे यांची मुदत संपल्याने आता प्रवीण देशपांडे अध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत.पुणे जिल्हयात या अगोदर झालेल्या निवडणुकीनंतर बापूसाहेब गोरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेली आहेत.
जिल्हा पत्रकार संघांच्या निवडणुकांवरून अनेक जिल्हे ढवळून निघाले आहेत.बहुसंख्य पत्रकार निवडणुकांचे स्वागत करीत असले तरी निवडणुकामुळे ज्यांचे अस्तित्वच संपुप्टात येत आहे अशी मंडळी मांत्र आदळआपट करताना दिसत आहे.राज्यात ज्या जिल्हा संघांनी निवडणुका घेतलेल्या नाहीत अशा संघांनी ताताडीने निवडणूक प्रक्रिया सुरू कऱण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे.