मंत्रालय आणि वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी दिलीप सपाटे
——————-
मुंबई,दि.३० मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणुकीत दै.पुढारीचे दिलीप सपाटे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.दिलीप सपाटे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दै.लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांचा पराभव केला.दिलीप सपाटे यांना ७१ तर प्रमोद डोईफोडे यांना ४६ मते मिळाली.
वार्ताहर संघाच्या उपाध्यक्षपदी दै.पुढारीचे संदेश सावंत यांनी ४६ मते घेत विजय संपादन केला.त्यांचे प्रतिस्पर्धी दूरदर्शनचे दिलीप जाधव यांना ४१ तर दै.पुण्यनगरीचे सदानंद शिंदे यांना ३३ मते मिळाली.कार्यवाहपदी फ्री प्रेस जर्नलचे विवेक भावसार यांची निवड झाली.भावसार यांना ४६ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दै.लोकप्रश्नचे राजन पारकर यांना ३५ व नागपूर तरूणभारतचे प्रविण राउत यांना २६ मते मिळाली.दै.नवराष्ट्रचे किशोर आपटे यांना १५ मते मिळाली.
कोषाध्यक्षपदी दै.शिवनेरचे महेश पावसकर हे ४६ मते मिळवून विजयी झाले.त्यांचे प्रतिस्पर्धी दैनिक देशोन्नतीच्या नेहा पुरव यांना ४१ तर हिंदुस्तानचे विनय खरे यांना ३२ मते मिळाली.
कार्यकारिणी सदस्यपदी सर्वाधिक ८२ मते मिळवून हमारा महानगरचे रामदिनेश यादव विजयी झाले.त्या खालोखाल जनतेचा महानायकचे राजू झनके यांना ७५,मुंबई समाचारचे विपुल वैदय यांना ७२,दै.सम्राटचे जासंग बोपेगावकर यांना ७० तर देशदूतचे अनिकेत जोशी यांना ६६ मते मिळवून ते विजयी झाले.सहावे उमेदवार सांज महानगरीचे खंडूराज गायकवाड यांना ६५ मते मिळून त्यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महानगरच्या प्रविण पुरो यांनी काम पाहिले.मावळते अध्यक्ष अरविंद उर्फ आप्पा भानुशाली यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.