बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची थेट निवडणूक!*
*अध्यक्षपदी अरुण जैन, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे सरचिटणीस नितीन शिरसाट
*
बुलडाणा:मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नीत बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारीणीची थेट निवडणूक आज रविवार २९ डिसेंबर रोजी पत्रकार भवनात पार पडली, ती लोकशाही पध्दतीने.. मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनात. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील हे अध्यक्षस्थानी होते. तर पिठासीन अधिकारी म्हणून नरेंद्र लांजेवार व सहाय्यक म्हणून रणजीतसिंह राजपूत यांनी काम पाहिले. यावेळी अरुण जैन यांची अध्यक्षपदी अविरोध तर शेवटच्या क्षणी चंद्रकांत बर्दे यांची कार्याध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. तर प्रत्यक्ष निवडणुकीतून नितीन शिरसाट हे सरचिटणीस पदी विजयी झाले. 
जिल्हा पत्रकार भवनात दुपारी १.३० वाजता सुरु झालेल्या बैठकीत या निवडणुकीमागची पृष्ठभूमी आरंभी परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी विस्तृत केली. मग त्यानंतर उपस्थितांनी आपले मत मांडले. ही चर्चा खूप वादळी ठरली. त्यानंतर लोकशाही पध्दतीनेच निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. 
सहसचिव पदासाठी यशवंत पिंगळे यांची अविरोध  तर  राजेश डिडोळकर यांची निवडणुकीतून निवड जाहीर झाली. कोषाध्यक्षपदी अ‍ॅड.हरिदास उंबरकर बिनविरोध जाहीर झाले. जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी युवराज वाघ, विश्वास पाटील आणि प्रशांत देशमुख यांचीदेखील बिनविरोध निवड जाहीर झाली.
जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य म्हणून संजय जाधव, निलेश राऊत, नितीन पाटील, सतीशचंद्र रोठे व अनिल उंबरकर यांची निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारणीच्या निवडीचे अधिकार हे नवनियुक्त अध्यक्षांना यावेळी सर्वानुमते देण्यात आले. 
आज रविवार २९ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुरु झालेली ही निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ६ वाजे पर्यंत चालली. १९९६ नंतर पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणूक मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी जाहीर केली होती व विशेष म्हणजे ती पुर्णत: पारदर्शकपणे पार पडली, हे येथे उल्लेखनीय!
प्रथमच बुलडाणा जिल्हा पत्रकार संघावर १३ तालुका पत्रकार संघांनी सर्वानुमते प्रतिनिधी पाठविले. त्यात बुलडाणा तालुका- महेंद्र बोर्डे, चिखली तालुका- संतोष लोखंडे व मंगेश पळसकर, मेहकर तालुका- रफिक कुरेशी, सिंदखेडराजा तालुका – गजानन काळूसे व गजानन मेहत्रे, दे. राजा तालुका – मुशीरखान कोटकर व सुषमा राऊत, लोणार तालुका- डॉ.अनिल मापारी व उमेश पटोकार, शेगाव तालुका- राजेश चौधरी, जळगाव जामोद तालुका- गुलाबराव इंगळे, संग्रामपूर तालुका- प्रशांत मानकर, मलकापूर तालुका- राजेंद्र वाडेकर, खामगाव तालुका- गजानन कुलकर्णी व किशोर भोसले यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिध्दीप्रमुख अमर राऊत यांनी दिली आहे. Attachments areaReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here