अध्यक्षपदी अनिल भोळे अध्यक्ष

0
966

आज दिनांक 28 मार्च 2015 रोजी पनवेल शासकीय विश्रामगृह येथे पनवेल तालुका प्रेस क्लबचि स्थापना करण्यात आली. पनवेल तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अनिल भोळे तर कार्यध्यक्षपदी दीपक महाडिक, उपाध्यक्षपदी सय्यद अकबर, सचिवपदी विजय पवार, खाजिनदारपदी सुधीर पाटिल, संपर्क प्रमुख आणि प्रसिद्धिप्रमुखपदी विशाल सावंत व सहखजिनदार म्हणून संतोष भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर प्रेस क्लबच्या सल्लागारपदि विजय कडु आणि निलेश सोनावणे हे असणार आहेत. पनवेल शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या सभेत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अनेक विषयांवर चर्चा होऊन नविन होतकरु पत्रकारांना पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य करण्यात आले. पनवेल तालुका प्रेस क्लबचे पहिल्याच सभेत 28 ते 30 सदस्य झाले आहेत. सर्व पदधिकार्यांचे आणि सदस्यांचे आभार. लवकरच पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून विविध सामजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. सभेमध्ये अल्पशः आजराने निधन झालेले सामनाचे पत्रकार प्रशांत माने यांना प्रेस क्लबतर्फे श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.यावेळी आनंद पवार, संजय कदम, आबासाहेब लालझरे, सुबोध म्हात्रे, श्री कासार, अविनाश अवराडकर, मंगेश देशपांडे यांसोबत नविन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य पनवेल तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी व्हावे असे आव्हान अध्यक्ष अनिल भोळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here