मराठी पत्रकार परिषदेच्या आणखी एका लढयास यश मिळालं आहे.राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाहीतून मोफत प्रवास करण्यासाठी सवलत मिळावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सर्वप्रथम 16 मे 2018 रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन केली होती.त्यावेळी रावते यांनी लवकरच तशी घोषणा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्यानंतर पाटण अधिवेशनाच्या वेळेसही दिवाकर रावते यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून दिली गेली होती.मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्याकडंही त्याचा पाठपुरावा केला होता.अखेर आज हे सारे प्रयत्न फळास आले असून परिवहन मंत्र्यांनी शिवशाहीमधून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास करण्याची सवलत जाहीर केली आहे.आज पत्रकार परिषदेत रावते यांनी ही घोषणा केली.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिवाकर रावते यांनी केलेल्या घोषणेबद्दल धन्यवाद दिले आङेत.
अभिनंदन
Thanks