अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांसाठी महत्वाची सूचना
मराठी पत्रकार परिषदेचे चाळीसावे अधिवेशन येत्या शनिवारपासून भोसरीत सुरू होत आहे.या अधिवेशनास राज्यातून अडीच हजारांवर पत्रकार येतील अशी अपेक्षा आहे.त्यादृष्टीन नियोजन केलं गेलं आहे.अधिवेशनात पत्रकार नसलेली काही मंडळी घुसखोरी करते असाही अनुभव मागील काही अधिवेशनात आलेला आहे.त्यामुळं यावेळी संयोजन समितीने थोडी काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.कृपया सहकार्य करावे.
अधिवेशन स्थळी पोहचल्यानंतर प्रत्येकाला शंभर रूपये भरून नोंदणी करावी लागणार आहे.ही नोंदणी करताना प्रत्येक पत्रकाराला आपण पत्रकार असल्यासंबंधीचे अोळखपत्र दाखवावे लागेल.त्यात दैनिकानं दिलेलं आय कार्ड असेल,साप्ताहिकाचे मालक-संपादक असतील तर त्यासंबंधीचा पुरावा दाखवावा लागेल.अॅक्रीडेशन कार्ड असेल तर तेही दाखविता येईल.यापैकी काहीच नसेल तर संबंधित जि्ल्हयातील पत्रकार संघाच्या अध्यक्षांची शिफारसही गृहित धरली जाईल.थोडक्यात आपण पत्रकार असल्याचे सिध्द करणारा कोणता तरी पुरावा दाखविल्याशिवाय नोंदणीची प्रक्रिया पूर्णे करता येणार नाही याची कृपया नोंद द्यावी.अनेकांना हे त्रासदायक वाटेल परंतू येणाऱ्या पत्रकारांना निवास आणि भोजणाच्या व्यवस्थेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे.आपणास पत्रकार असल्याचा पुरावा मागून कोणी आपला अवमान करीत नाही.फक्त आपल्या सवार्च्या सोयी साठीच हे पाऊल उचलावे लागत आहे.कृपया सहकार्या करावे.गैरसोय होऊ नये यासाठी काही शिस्त पाळणे अावश्यक आहे हे कृपया येणाऱ्या पत्रकारांनी लक्षात ठेवावे.