चलो पिंपरी-चिंचवड
मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसाव्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे.2013मध्ये औरंगाबादला झालेल्या अधिवेशनात 1800 पत्रकार आले होते.पुण्यात अडीच हजार पत्रकार येतील असे गृहित धरून व्यवस्था कऱण्यात येत आहे.पावसाळा वेळेत सुरू होणार असल्यानं अधिवेशन बंद हॉलमध्येच घेतले गेले आहे.1200 लोक बसू शकतील एवढी क्षमता अकुशराव लांडगे सभागृहाची आहे.ज्या पत्रकारांना हॉलमध्ये जागा मिळणार नाही त्यांच्यासाठी बाहेर टीव्ही लावले जाणार असून तेथे हजार जणांची व्यवस्था करण्यात येत आहे.जेवणासाठी पत्र्याचा मांडव टाकण्यात येणार आहे.एकाच वेळी किमान हजार पत्रकार जेवण घेऊ शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे.
पत्रिका छापून झाल्या असून उद्या (शुक्रवारी) त्या पाळंदे कुरिअर मार्फत राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात येत आहेत.पत्रिका केवळ जिल्हा संघांकडंचे जातील.जिल्हा संघांनी तालुक्यांकडे या पत्रिका पाठवायच्या आहेत.तालुका पत्रकार संघ किंवा व्यक्तिगत स्वरूपात कोणालाही पत्रिका पाठविणे परिषदेला शक्य नाही.हे कृपया सदस्यांनी लक्षात घ्यावे,बहुतेक जिल्हा संघांशी अधिवेशन संयोजकांमार्फत संपर्क साधला गेला आहे.ज्यांनी पत्रिका पाठविण्यासाठी अध्याप आपले पत्ते एसएमएस केलेले नाहीत त्यांनी आपले पत्ते 9545222212 किंवा 9822222772 या क्रमांकावर एसएमएस करावेत किंवा संपर्क साधावा.25 पर्यत पत्रिका सर्वांना मिळतील या दृष्टीनं जिल्हा संघांनी प्रय़त्न करायचे आहेत.24 तारखेपर्यथ पत्रिका मिळाल्या नाहीत तर त्याची सूचना पिंपरी-चिंचवडच्या आयोजकांना द्यावी.त्यानंतर पत्रिकांबाबतची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही हे कृपया लक्षात घ्यावे.
वसंत काणे नगरीच्या आसपासच निवासाची व्यवस्था कऱण्यात आलेली आहे.प्रत्येक जिल्हा संघानी वरील क्रमांकावर फोन करून आपल्या जिल्हयातून किती पत्रकार अधिवेशऩासाठी येणार आहेत याची माहिती कळविली तर व्यवस्थेच्यादृष्टीनं सोपं जाईल आणि गैरसोय होणार नाही.हॉलच्या जवळ 500 गाड्या ठेवता येतील असे वाहनतळ तयार कऱण्यात येणार आहे.बसनं येणाऱ्याना मनपाच्या बसमधून भोसरीला येता येईल.पुणे स्टेशन आणि पुणे मनपापासून या बसेस भोसरीला जातात.
अधिवेशनात भरगच्च काय्रक्रम आहेत.त्यामुळं सर्व कार्यक्रम वेळेत सुरू होतील.उदघाटन समारंभ ठीक दहा वाजता सुरू होईल.त्यामुळं सर्वांनी वेळेत यावं ही विनंती आहे.अधिवेशनासाठी 100 रूपये नोंदणी शुल्क आकारले जाणार असून अंकुशराव लांडगे हॉल परिसरातच ही नाव नोंदणी केली जाणार आहे.नाव नोंदणीच्या वेळेस पत्रकारांनी तेथे ठेवलेल्या नोंद वहीत आपला पूर्ण पत्ता आणि इ मेल आयडी देणे आवश्यक आहे.अधिवेशनाच्या बातम्या आणि फोटो लगेच दिलेल्या मेल आय़डीवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.ज्यांना स्वतंत्रपणे बातम्या पाठवायच्या आहेत त्यांच्यासाठी स्वतत्र व्यवस्था कऱण्यात आली असून मिडिया सेंटरही निर्माण कऱण्यात येत आहे.
येणाऱ्या पत्रकार मित्रांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात अधिवेशनासा जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम.देशमुख,किरण नाईक,चंद्रशेखर बेहेरे,संतोष पवार,सुभाष भारव्दाज,डी.के.वळसे पाटील,शरद पाबळे,बापूसाहेब गोरे,बाळासाहेब ढसाळ आदिंनी केले आहे.