पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या चाळीसाव्या अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे,महाराष्ट्रभर निमंत्रण पत्रिका पोहोचल्याचे फोन येत आहेत.आम्ही अधिवेशानास येत असल्याचे फोन पाथरी,सेलूपासून ते सावंतवाडी पयर्त वेगवेगळ्या गावांमधून येत आहेत.२५०० एवढया विक्रमी संख्येने पत्रकार पिंपरीच्या अधिवेशनास येतील असा अंदाज आहे.निवास आणि भोजन व्यवस्था तेवढी संख्या गृहित धरूनच केली जात आहे.एकच अडचण आहे.ज्या अंकूशराव लांडगे सभागृहात हे अधिवेशन होत आहे त्याची सिटींग कॅपसिटी ११०० एवढी आहे.म्हणजे जवळपास तेवढयाच लोकांना त्रकारांनी ९.३० वाजताच आसनस्थ व्हावं असं आमचं आवाहन आहे.एकाच ठिकाणी साऱ्यांची निवास व्यवस्था केली आहे.तसेच भोजनही वेळेस हजार लोकांना घेता येईल.आलेल्या पत्रकारांनी १०० रूपये भरून नोंदणी करायची आहे.नोंदणी करणाऱ्या पत्रकारांना आेळखपत्र आणि निवास तसेच भोजन कुपन्स मिळतील,तयारी आम्ही व्यवस्थित केली आहे.हे आपलं अधिवेशन असल्यानं व्यवस्थेत काही चुका राहिल्या तर त्याची जबाबदारी माझी आहे.आपल्याकडून मला आणि संयोजन समितीला सहकायर् मिळेल अशी अपेक्षा आहे.आपल्या सवार्ंच्या मदतीनं अौरंगाबादचं अधिवेशन सक्सेस झालं होतं.पिंपरीचं अधिवेशनही यशस्वी यात शंका नाही.पुणे जिल्हयात अधिवेशन होत असल्यानं पुण्यातील पत्रकारांची जबाबदारी आहे की,त्यांनी हे अधिवेशन .यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.पुणे जिल्हयातून किमान ५०० पत्रकार उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.अधिवेशनासाठीचे सवर् पाहुणे उपस्थित राहणार आहेत.मुख्यमत्री फडणवीससाहेब,शरद पवारसाहेब तसेच अण्णा हजारे,राजेंद्रसिंहजी ,सदानंद मोरे उपस्थित राहात असल्याचे त्यांनी कळविले आहे.