*व्यथा एका ज्येष्ठ पत्रकाराची*.. *थेट अदिती तटकरे यांच्या दरबारात कैफियत* केदारनाथ नारायणदास दायमा..जळगावचे पत्रकार..वय वर्षे 71..1985 पासून एक साप्ताहिक चालवतात..ते सरकारच्या जाहिरात यादीवर देखील आहे.साप्ताहिकाचे संपादक म्हणून दायमा यांना 1991 पासून सरकारने अधिस्वीकृती पत्रिका दिलेली आहे.त्याला तीस वर्षे लोटली. ..दु:ख यांचं की, सारं काही रितसर असताना त्यांनी सराकने अजून पेन्शन सुरू केलेली नाही.माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अधिकरयांकडे याची खंडीभर कारणं आहेत.. त्याबद्दल दायमा सांगतात,”मी आजही पत्र्याच्या घरात राहतो..मी माझ्या साप्ताहिकाचे सर्व जुने अंक माझ्याच घरात ठेवले होते.पण 2014 मध्ये पावसाने हे सारे अंक भिजले..त्यामुळे मला ते उकीरडयावर टाकावे लागले.सरकार म्हणतंय‘2008 ते 2015 या काळात अंकात खंड होता त्यामुळे तुमची सलग सेवा 30 वर्षांची होत नाही.. .जर अंकात खंड होता तर मग अधिस्वीकृतीचे नूतनीकरण का केले गेले हा दायमा यांचा सवाल आहे आणि .तो रास्तही आहे..2008 ते 2015 या काळात दायमा यांच्या साप्ताहिकाचे अंक निघाले नसतील तर मग ते पत्रकार असत नाहीत ..अशा स्थितीत त्यांच्या अधिस्वीकृतीचे नूतनीकरण करणार्या अधिकार्यांवर माहिती आणि जनसंपर्क विभाग कारवाई करणार आहे का? याचं उत्तर नाही असंच असेल.. अधिकारयांना पाठिशी घातले जाईल पण ते निमित्त करून दायमांची पेन्शन मात्र रोखली जाईल.. सारंच अन्याय्य आणि संतापजनक आहे..ऑगस्ट 2019 पासून पेन्शन योजना सुरू झाल्यानतर गेली दीड वर्षे सगळ्या मार्गानं प्रयत्न करून दायमा थकले.शेवटी केदारनाथ दायमा,अरूण मोरे,मोहन साळवी आणि मुजूमदार या सर्व समदुःखी पत्रकारांनी मंत्रालयात जाऊन माहिती आणि जनसंपर्क मंत्री आदिती तटकरे यांचे दरवाजे दोन दिवसांपुर्वीच ठोठावले..आदिती तटकरे यांनी या वयोवृध्द पत्रकारांची आस्तेनं चौकशी केली.. त्यांच्याकडची 31 वर्षांची अधिस्वीकृती पत्रिका पाहून त्याच म्हणाल्या… “काय अडचण आहे? तुम्हाला पेन्शन मिळायलाच हवी” .. त्यांनी लगेच संबंधित अधिकारयास बोलावून यांच्या पेन्शनचा प्रश्न सोडविण्याची सूचना केली.अपेक्षा अशी आहे की,दायमा आणि त्यांच्या समवेतच्या अन्य वयोवृध्द पत्रकारांची मुंबईवारी फलदायी ठरेल.. त्यांचा पेन्शनचा विषय लगेच मार्गी लागेल.दायमा दाम्पत्य आज कोणत्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे हे समजण्यासाठी त्यांची कौटुंबिक स्थिती जाणून घेणे अनिवार्य आहे.. दायमा यांना चार मुली. चौधींचेही विवाह झालेल. आज दायमा पती, पत्नीच परस्परांचा आधार आहेत.. आयुष्यभर पत्रकारिता केलेली असल्याने काही बचत असण्याची शक्यता नाही.. उत्पन्नाचं अन्य कोणतंही साधन नाही.. रोजच्या गरजांबरोबरच औषधालाही फार पैसे लागतात.. “हे सारे पैसे आणायचे कोठून ? दायमांचा हा सवाल मला निरूत्तर करून गेला.. ते म्हणतात,” मराठी पत्रकार परिषदेने अथक पाठपुरावा करून राज्यातील गरजू पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केली.. पण गरजू आणि पात्र पत्रकारांना योजनेचा ला़भच मिळत नाही.. अनेक अपात्र पत्रकारांना मात्र ती मिळाली” .. दायमांची ही तक़ार रास्त होती.. ते पुढे म्हणतात, “आमहाला11, 000 रूपये पेन्शन मिळाली तर आमचं उत्तर आयुष्य आनंदात नसले तरी बरेच सुसह्य होईल.. स्वाभिमानाने जगता येईल”..अपेक्षा अशी आहे की, आता दायमा यांचा फार अंत न बघता त्यांना सन्मान योजनेत सामावून घेतले जाईल..त्यांना पेन्शन सुरू होईल.. *एस.एम.देशमुख*ReplyForward |