अतुलेंजी को गुस्सा क्यू आता है…

0
1039

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आल्या की अ.र.अंतुले रायगडकरांना हमखास आपलं अस्तित्व दाखवून देतात.एरवी रायगडमध्ये जेव्हा केव्हा  जिल्हा परिषदा,नगरपालिका, पंचायत समित्या किंवा तत्सम  निवडणुका असतात तेव्हा” अंतुले कोठे आहेत”? असा प्रश्न विचारलेलेही त्यांना आवडत नाही.( – मी एकदा असा प्रश्न विचारण्याची हिमाकत केली होती तेव्हा ते माझ्या नोकरीवरच उठले होते ) अंतुले महान नेते आहेत,त्यांनी गल्ली- बोळातल्या निवडणुकात रस घेणं त्याच्या प्रतिष्ठेला शोभा देणारं नाही हे गृहितक जरी आपण मान्य केलं तरी काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत त्यांचा जेव्हा संबंध नसतो ( म्हणजे ते उभे नसतात ) तेव्हा तरी ते अशा निवडणुकांत रस घेतात का ? असं विचाराल तर  त्याचंही उत्तर” नाही” असंच  मिळेल. .अ.र.अंतुले यांनी लोकसभेची पहिली निवडणूक 1989 मध्ये लढविली.ते जिंकले पण त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकातूनही  अंग काढून घेतलं.विधानसभा उमेदवाराच्या प्रचारासाठी अंतुले रायगडात  आलेत असं अभावानंच घेडलेलं मी पाहिलं आहे.(त्यावर एका निवडणुकीत मी “अंतुले या,रायगड आपल स्वागत  असा “या मथळ्याखाली  लेख लिहिला होता.)1989,1991,आणि 1996 असे सलग तीन वेळा अंतुले रायगडमधून विजयी झाले होते.मात्र त्यांंचं मताधिक्य क्रमशः घटत गेलं.1996 मध्ये तर अनंत तरेंच्या विरोधात ते जेमतेम 10 हजार मतांनी विजयी झाले होते.( त्याबद्दल त्यांनी आकांडतांडव करीत कार्यकर्त्यांना चांगलंच फ ैलावर घेतलं होतं )1998मघ्ये  ते रामशेठ ठाकूर यांच्या विरोधात पराभूतच झाले.त्यानंतर 1999मध्ये जी निवडणूक झाली ती अंतुले यांनी कुलाब्यातून लढली नाही.अंतुले औरंगाबादला गेले.तेथे पराभूत झाले.अंतुले औरंगाबादला गेल्यानं त्यांचा रायगड निवडणुकीशी काही संबंध उरला नाही.त्यामुळं आपल्या ऐवजी ज्या पुप्पा साबळे यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे,त्याचं प्रचाराचं कसं चाललंय, ? त्यांच्यासाठी रायगडला गेलं पाहिजे,त्यांना विजयी करण्यासाठी काही करिष्मा दाखविला पाहिजे असा कोणताही प्रयत्न तेव्हा अ तुंले यांनी केल्याचं मला स्मरत नाही.याचा अ र्थ निवडणुकांशी जेव्हा त्यांचा संबंध असतो किवा त्यांना जेव्हा डावलेले गेलेले असते तेव्हाच ते  लोकसभा निवडणुकीतही  रस घेतात हा इतिहास आहे.आता ते जो रस घेत आहेत तो त्यांना डावलले गेल्यामुळं.

– लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना एक दोन वेळा अंतुले याचं नाव वाचण्यात आलं. “रायगडची जागा कॉग्रेसनेच लढवावी” अशी अंतुलेंची इच्छा असल्याची बातमीही वाचली होती .पक्षासाठी असा हट्ट अंतुले धरतात म्हणून अनेकांना बरंही वाटलं असेल.मला मात्र अंतुलेंचा हा आग्रह पक्षासाठी चालला असेल यावर विश्वास बसत नव्हता.नंतर अपेक्षेप्रमाणं बातमी आली,” अंतुले स्वतः इच्छुक नाही त पण रायगडची जागा अंतुले यांची मुलगा किंवा मुलीला मिळावी अशी त्यांची इच्छा आहे ” हे समोर आलं.त्यासाठी त्यांनी खटाटोपही करून पाहिला,पण कॉग्रेस त्यांच्या आग्रहाला बळी पडली नाही.समर्थ  उमेदवारच नसल्यानं कॉग्रेसनं ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्याचा नि र्णय़ घेतला.मला वाटतं, कॉग्रेसचा तो नि र्णय योग्यच होता.मात्र पक्षानं आपल्याला डावलून नि र्णय़ घेतल्याबद्दल स्वाभाविकपणे अंतुले चिडले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी कॉग्रेस नेतृत्वावरच तोफ डागली. “नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी पंतप्रधानपदाच्या पात्रतेचे  नाहीत” असे “रोखठोक” विधान त्यांनी केले आहे.राहूल गांधी यांचं एकट्याचं नाव घेतलं तर गहजब माजेल म्हणून त्यांनी मोदींनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असलं तरी त्यांचा राग राहूल यांच्यावरच आहे हे लपून राहिलेेलं नाही.”राहूल गांधी यांनी अगोदर मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात काम करावं आणि नंतरच पंतप्रधानपदाची दावेदारी दाखल करावी “अशीही त्यांची सूचना आहे. – हे विधान करतानाच आपण “खरं तेच बोलतो ” अशी पुष्ठीही त्यांनी जोडली आहे.ही पुष्ठी जाडताना   राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना कोणता अनुभव होता हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. असं विचारलेलंही त्याना आवडत नाही.ते जे बोलतात तेच अंतिम सत्य असतं यावर त्यांचा गाढा विश्वास आहे.समजा अंतुले यांच्या घरातील किंवा नात्यातील व्यक्तीला तिकिट मिळालं असतं तर त्यांनी हे सत्य कथन केंलं असतं का?  तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच असेल.मात्र पक्षानं डावलेले असल्यानं ते चिडले.त्यातून त्यांनी राहूल गांधी यांची लायकी काढली.तेवढ्यावरही ते थांबले नाहीत रायगडमधील त्यांचा गट म्हणे,शेकापच्या उमेदवारास पाठिंबा देणार आहे.जयंत पाटील यांनीच ही माहिती दिली आहे.अंतुले यांनी त्याचा अजून इन्कार केलेला नाही म्हणजे जयंत पाटील जे बोलले आहेत ते सत्य आहे असं म्हणता येईल.अंतुले आता 85 वर्षांचे झालेले असल्यानं आता त्याचं राजकारण जवळपास संपल्यातच जमा आहे. ते राहूल गाधी यांच्या विरोधात बोलू शकतात किंवा पक्षाच्या विरोधात शेकापला मदत कऱण्याची भूमिकाही घेऊ शकतात.मात्र माणिक जगताप असोत,रामशेठ ठाकूर असतो,मधू ठाकूर असोत किंवा रवी पाटील असोत याना असं बोलता आणि पक्षानं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात काही करताही येणार नाही.याचं कारण त्यांना जिल्हयात अजून राजकारण करायचं आहे.लोकसभेच्या निवडणुकात त्यांच्या विधानसभेची गणितं दडलेलं असल्यानं त्यांना पक्षाचा आदेश मानणं आणि सुनील तटकरेंना निवडणून आणणं क्रमप्राप्त आहे.त्यात त्याचा व्यक्तिगत स्वार्थही आहे.कारण लोकसभेत सुनील तटक रेंना काही द गा फटका झाला तर कॉग्रेसचे जे नेेते आमदार व्हायला उत्सुक आहेत त्यांची खैर नाही हे त्यांनाही माहित असल्यानं ते तटकरे यांच्या कामाला लागले आहेत.आणखी एक कंगोर आहे.अंतुले कोणाला मदत करायला सागतात तर शेकापला.  मधू ठाकूर,रामशेठ ठाकूर,रवी पाटील यांची शेकापशी व्यक्तिगत दुष्मनी आहे.अशा स्थितीत अंतुले सागतात म्हणून शेकापला मदत करीत तटकरेंना अंगावर घेण्याएवढे अपरिपक्व राजकारणी यापैकी कोणीच नाही.कॉग्रेसचे हे सारे नेते पाहिजे तर मुनलाईटवर जाऊन अंतुलेंना कर्णिसात घालतील पण ते म्हणतात म्हणून शेकापला मदत नक्कीच करणार नाहीत.

मग जयंत पाटील जो कॉग्रेसमधील अंतुले गट म्हणतात तो कोणता ? हा प्रश्न वाचकांना पडू शकतो.रायगडात अंतुलेंचा असा स्वतःचा कोणताही गट  नाही.जिल्हा का्रग्रेसमध्ये भांडणं लावायची,नेत्यांना आपसात झुंजवत ठेवायचं आणि एकदा एकाला तर नंतर दुसऱ्याला मुनलाईटवर बोलावून पक्षात परस्पर अविश्वासाचे वातावरण तयार करायचे असेच राजकारण करीत अंतुले यांनी जिल्हा कॉग्रेसवर अनेक वर्षे पकड ठेवली.अंतुलेंचं जेष्ठत्व,त्याचं पक्षात असलेलं वजन यामुळे जिल्हयातील पक्षाचे नेते कधी त्यांच्या विरोधात गेले नाहीत.या मागं काही अंशी भितीही होती .हे सारं खरं असलं तरी अंतुले पक्षाच्या विरोधात भूमिका घ्या म्हटल्यानं कोणी त्यांची री ओढेल अशी अजिबात शक्यता नाही.1984 ची परिस्थिती वेगळी होती,त्यावेळचा प्रसंग वेगळा होता आणि त्यावेळचे अंतुलेही वेगळे होते.आज तशी स्थिती जिल्हयात नसल्यानं अंतुलेंना मानणारेही त्यांचा आदेश माऩत शेकापला मदत करतील असं मला अजिबात वाटत नाही.जिल्हयात अशी अनेक घराणी आहेत की,ज्यांच्या चार-चार पिढ्या कॉग्रेसशी एकरूप झालेल्या आहेत.ही जुनी घराणी नक्कीच अंतुलेंवर प्रेम कऱणारी आहेत पण अंतुले सागतात म्हणून ही मंडळी शेकापला मदत करतील हे शक्य नाही.कारण जिल्हयातील प्रामाणिक कॉग्रेसवाल्यानं नेहमीच शेकापच्या विरोधात राजकारण केलेलं आहे,किंबहुना शेकाप विरोध हाच त्यांच्या राजकारणाचा धागा राहिलेला आहे.त्यामुळं नेेते कोठेही गेले तरी सामांन्य कॉग्रेस कार्यकर्ता पक्षातच राहिला.पक्षादेश हाच त्याच्यासाठी अंतिम शब्द राहिल्यानेच अंतुले औरंगाबादला पळून गेल्यानतंरही पुप्पा साबळे या नवख्या उमेदवारालाही तब्बल दीड लाख मतं पडली होती.ही मतं कोण्या एका गटाची नव्हती तर कॉग्रेसला मानणाऱ्या सामांन्य रायगडवासियांची होती हे विसरता येणार नाही.1984चा अनुभव लक्षात घेऊन अंतुले लोकांना गृहित धरणार असतील तर तो त्यांचा भ्रम ठऱणार आहे. कारण आज अंतुलेंवर अन्याय झालाय असं कोणालाच वाटत नाही.कॉग्रेसनं एवढं भरभरून दान अंतुले यांच्या पदरात टाकलेलं आहे की,त्यांनी पक्षाचं कायम कृतज्ञ राहायला हवं असंच सामांन्य कॉग्रस कार्यकर्त्याला वाटतं,पण काही माणसं कायम असंतुष्ट असतात.अंतुले याच पंथातले आहेत.का्रग्रेसने अंतुलेंना1962मध्ये प्रारंभी आमदार केले.त्यानंतर अनेकदा ते आमदार झाले.राज्यमंत्री ,कॅबिनेट मंत्री आणि अंतिमतः – मुख्यमंत्रीपदही त्यांना दिलं.9जून 1980 ते फ़ेब्रुवारी 82 या काळात ते मुख्यमंत्री होते.पण एका प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या निधीचे प्रकऱण अंगलट आले.न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिल्यानं त्याना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं.त्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष काढला.त्यातून काही राजकारण पुढं जात नाही असं दिसल्यावर ते पुन्हा कॉग्रेस पक्षात परतले.त्यानंतरही त्याचं बंड विसरून कॉग्रेसनं त्यांना वारंवार खासदार केलं.1989,1991,1996 असे सलग तीन वेळा  आणि नंतर 2004मध्ये ते लोकसभेवर कॉग्रेसचे खासदार म्हणून गेले.त्यांना एकदा राज्यसभेवरही पाठविले गेले होते.केंद्रीय मंत्री म्हणून ते अगोदर नरसिंहरावांच्या आणि नंतर मनमोहनसिंग यांच्या सरकारात होते.2009मध्ये अनंत गीते यांच्याविरोधात ते पराभूत झाले  नसते तर ते पुन्हा मंत्री नक्कीच झाले असते.आता यापेक्षा आणखी काय हवं होतं अंतुलेंना.? जिल्हयात असे असंख्य निष्टावान कार्यकर्ते आहेत की,ज्यांना पक्षानं जिल्हा परिषदेतही पाठविलं नाही पण त्यांनी पक्षाशी कधी फंदफितुरी केली नाही.पक्षादेश कधी अव्हेरला नाही. – पक्ष माझं ऐकत नसेल तर थेट पक्षनेतृत्वावर झोड उठवत शेकापला मदत कऱण्याची भाषाही केलेली नाही.अंतुलेंना सारं काही मिळुनही ते जर पुन्हा बंडांची भाषा कऱणार असतील तर ते यशस्वी होणार नाही.चार माणसंही त्यांच्या बरोबर असणार नाहीत .अंतुले शेकापसाठी सभा घेऊ लागले तर ज्या मैदानावर त्याचं हार फुलांनी कॉग्रेसवाल्यांनी स्वागत केलं ति थं अतुलेंना काटे बोचल्याशिवाय राहणार नाहीत.

कारण वडखळ नाक्यावर प्रभाकर पाटील यांनी अंतुलेंची गाडी अडवून त्यात स्मगलिंग चं सोनं असल्यानं गाडीची तपासणी करायला भाग पाडलेलं प्रकऱण असेल किंवा ते बाधकाम मंत्री असताना त्यांच्यावर शेकाप नेत्यांनी उचललेली चप्पल असेल हे सारे प्रसंग कदाचित अंतुले विसरले असतील पण सामांन्य कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील ही बोच आजही कमी झालेली नाही.  या कारणांमुळे अनेक कॉग्रेसजन शेकापला आजही माफ करायला तयार नाहीत.मग भले अंतुलेनी स्वार्थासाठी ते जहर गिळले तरीही सामांन्य कार्यकर्त्याच्या मात्र शेकापला मदत करण्याचा अंतुलेंचा पवित्रा पचनी पडणार नाही.हे वास्तव ओळखून अंतुले यांनी पक्षानं जे दिलं ते इतरांपेक्षा किती तरी पटीनं जास्तीचं दिलं याची जाणीव ठेऊन गप्प बसायला हवं होतं.अशाने  त्याचा आदर जिल्हयात पुढेही ठेवला गेला असता.मुनलाईटवरचा राबताही कायम राहिला असता पण आता नियमित मुनलाईटवर जाणारे रामशेठ ठाकूर असोत की अन्य कोणी ते अंतुलेंना भेटायला जावू शकणार नाहीत .त्यांनी तसं केलं तरी ते पक्ष शिस्तीच्या विरोधात जाईल आणि पक्षाच्या कारवाईला तोंड देण्याची वेळ त्यांच्यावर येईल.त्यामुळं अंतुले एकटे पडतील हे नक्की.कुठं थाबायचं हे लक्षात नाही आलं की अशीच वेळ येते.हे अंतुले असतील किंवा दत्ता खानविलकर यांना  हे कोण सांगणार ?

-एस एम देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here