यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार सुरु करीत असल्याची घोषणा
· ज्येष्ठ निवृत्त पत्रकार सन्मान योजनेचा शुभारंभ
· विविध पत्रकारिता पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुंबई, दि. २७ : सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज येथे विविध पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीयस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रीय पत्रकारास यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.
रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. २०१६ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दै. हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे. त्यांनी व्हीडीओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे.काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज या योजनेचा शुभारंभ केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणे यासोबतच समाजप्रबोधनाच्या कार्यात माध्यमांनी मोठे योगदान दिले आहे. पण आता माध्यमांचा संक्रमण काळ सुरु आहे. मुद्रीत माध्यमांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांपर्यंत झाला आहे. या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये कायम जपली पाहीजेत. बातम्यांद्वारे अफवा पसरल्यास त्यातून समाजस्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अशा संक्रमणाच्या काळात मूल्याधिष्ठीत पत्रकारिता करुन माध्यमांनी विश्वासार्हता जपावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पत्रकार सन्मान योजना सुरु झाल्याचा मनस्वी आनंद
तथ्य नसलेल्या बातम्यांचा खुलासा शासकीय यंत्रणेने तात्काळ करावा यासाठी आपण सतत आग्रही राहिलो. त्याचप्रमाणे तपशील खरा असेल तर अशा बातम्यांची दखल घेऊन त्याप्रमाणे कार्यशैलीत बदल करण्याच्या सूचनाही आपण संबंधित विभागास वेळोवेळी केल्या. निर्णय घेताना अशा बातम्यांचा नेहमीच सकारात्मक उपयोग झाला, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. पत्रकार हे दबावात काम करता कामा नयेत. पत्रकारांना सामाजिक सुरक्षाही असली पाहिजे. या भावनेतूनच शासनाने निवृत्त पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. आज या योजनेची प्रत्यक्षात सुरुवात करताना मनस्वी आनंद होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक (माहिती) सुरेश वांदिले यांनी आभार मानले.
पत्रकारिता पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस
आज पुरस्कार मिळालेले पत्रकार कांचन श्रीवास्तव आणि राजकुमार सिंह यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची घोषणा केली. त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस आज प्रदान करण्यात आले.
वर्षा फडके – आंधळे, डॉ. किरण मोघे, डॉ. सुरेखा मुळे यांना शासकीय गटातील पुरस्कार प्रदान
माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील २०१६, २०१७ आणि २०१८ साठीचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) अनुक्रमे मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके – आंधळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आणि मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच छायाचित्रकारांना देण्यात येणारा २०१६, २०१७ आणि २०१८ साठीचा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार प्रज्ञेश कांबळी, अमरावती येथील छायाचित्रकार मनीष झिमटे आणि अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत आनंदराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
विविध पत्रकारिता पुरस्कारांचे झाले वितरण
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध पत्रकारिता पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. पुरस्कारार्थी आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे –
वर्ष 2016 चे पुरस्कार –
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळतोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव, छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई |
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई – सकाळ, कोल्हापूर
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग– सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर-(51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक,
दै. लोकमत, लातूर
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे
शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग – अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर
वर्ष 2017 चे पुरस्कार –
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -लुमाकांत नलवडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) – राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) – खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) – दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) – संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) – मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग – अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे – 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजारदै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) – जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद
आचार्य <…