पत्रकारितेच्या निष्ठेला सलाम

0
987

मातोश्रीबाहेर एक नऊ फुटांचा अजगर सापडला. सुरक्षेच्या दृष्टीनं एवढ्या संवेदनशील ठिकाणी हा अजगर सापडल्यानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे तिथे ही बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकंदरीतच हा अजगर कसा आला आणि त्याला कसं पकडण्यात आलं, याबद्दल पोलिसांशी बातचित करत असताना अजगरानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडेच्या हाताचा चावा घेतला.

महत्त्त्वाची बाब म्हणजे अजगरानं चावा घेतल्यानंतरही आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे डॉक्टरकडे न जाता आधी ऑफिसला आले. त्यांनी अजगराचे व्हिज्युअल्स आणि पोलिसांचे बाईट्स ऑफिसमध्ये सोपवले आणि मग ते डॉक्टरांकडे गेले. 

अजगरानं चावा घेऊनही दिनेश दुखंडे यांनी आधी बातमी दिली आणि मगच डॉक्टरांकडे गेलेत. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. त्यांच्या या पत्रकारितेतल्या धैर्याचं आणि निष्ठेचं कौतुक. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here