नवी दिल्लीः राजीनामा देणार नाही अशी अडेलतट्टू भूमिका घेतलेल्या एम.जे.अकबर यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.वीस महिला पत्रकारांनी त्यांच्याविरोधात लैगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतरही ते मी नाही त्यातला अशी भूमिका घेत होते.एवढेच नव्हे तर आरोप करणार्या प्रिया रमानी यांच्या विरोधात त्यांनी एक कोटीचा दावा पटियाला कोर्टात दाखले केला होता.त्यासाठी 97 वकिलांची फौज उभी करण्याची तयारी त्यांनी केली होती.आरोप राजकीय असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
आज दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की,माझ्यावरील आरोपांच्या संदर्भात मी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळं मी आता परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून मला देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी परराष्ट्र मंत्री नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचा आभारी आहे. #MeeToo चळवळीचे हे मोठे यश असल्याचे समजले जात आहे.
त्यांचे मीटू ने वस्त्रहरण केले. अजून हट्टी भूमिका ठेवली असती तर चारित्र्याची चिरफाड झाली असती.