अक्कलकोटमध्ये पत्रकारांना वैचारिक मेजवानी
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्यांचा मेळावा आणि उत्कृष्ट कार्य करणार्या तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा गौरव समारंभ शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे होत आहे.या कार्यक्रमास राज्यभरातून 600 पत्रकार उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.सकाळी दहा वाजता माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे याच्या हस्ते मेळाव्याचे उद्दघाटन आणि बक्षीस वितरण करण्यात येईल.दुपारी 2 ते 3 या वेळात ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार अरूण खोरे यांचे प्रश्न पत्रकारांच्या अस्तित्वाचा या विषयावर व्याख्यान होईल.दुपारी 3 ते 4 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोलकर यांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकारिता या विषयावर महत्वाचे व्याख्यान होईल.त्यानंतर मेळाव्याचा समारोप होईल..या कार्यक्रमास जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्यांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेने केले आहे..