प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

दिल्लीः पंधरा महिला पत्रकारांनी लैगिक शोषनाचे गंभीर आरोप झाल्यानंतरही एम.जे.अकबर यांना पाठिशी घालण्याचा सरकार प्रयत्न करीत आहेत.एम.जे अकबर यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी होत असतानाही त्याकडं दुर्लक्ष केले जात आहे.उलटपक्षी आता एम.जे अकबर यांनी प्रिया रमानी या महिला पत्रकाराच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.या दाव्यावर आता दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.गंमत म्हणजे एम.जे.अकबर यांच्याबाजुनं 97 वकिलांची फौज मैदानात उतरणार आहे.आरोप करणार्‍या प्रिया रमानी यांना मात्र एकाकी ही लढाई लढावी लागणार आहे.कारण कालपर्यंत प्रिया यांच्याबाजुनं पोपटपंची करणारे अनेक जण आता मौनात गेले असून प्रिया यांना आपण मदत करू अशी एकही पोस्ट कोणी टाकलेली नाही हे विशेष.

आपण कोर्टाची लढाई लढण्यास तयार असल्याचे प्रिया यांनी म्हटलं आहे.सत्य हाच आपला बचाव आहे,अकबर यांनी तक्रारकर्त्या महिलांचं दुःख आणि भय याकडं अजिबात लक्ष दिलं नाही असा आरोप प्रिया यांनी केलाय.अनेक महिलांनी केलेले तपशीलवार आरोप एका केंद्रीय मंत्र्यानं राजकीय कट म्हणून फेटाळून लावल्याने मी निराश झाले आहे असंही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here