एम.जे.अकबर यांच्यावर चार महिलांनी आरोप करून चार दिवस झाले.कोणतीच कारवाई झालेली नाही.अमित शहा यांनी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात येईल असं म्हटलं असलं तरी ती केव्हा होईल,कोण करील हे स्पष्ट केलेलं नाही.
अकबर यांच्यावर कारवाई होत नाही आणि दुसरीकडं दररोज त्यांच्यावर आरोप होत आहेत.आज अमेरिकेतील सीएसएन वृत्तवाहिनीत काम करणार्या माजीली डी प्यु कॅम्प या महिला पत्रकाराने एम.जे.अकबर यांच्यावर गंभीर आरोप केलेत.अकबर यानी आपला लैगिक सुखासाठी छळ केला होता असं या महिला पत्रकाराने म्हटलं आहे.जेव्हा घटना घडली तेव्हा ही महिला पत्रकार 18 वर्षांची होती..
हफिंगस्टॉन पोस्टच्या वृतानुसार माजिली ककॅम्प तेव्हा एशियन एजमध्ये काम करीत होती.प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा कॅम्प अकबर यांच्या दालनात गेल्या तेव्हा तेथे काय घडले हे त्यांनीच आपल्या शब्दात सांगितले आहे.’मला संधी दिली म्हणून मी आभार मानण्यासाठी अकबर यांच्या केबिनमध्ये गेले.आभारासाठी हात पुढे केला.तेव्हा अकबर यांनी मला जवळ खेचले आणि माझे चुंबन घेतले.ते माझ्यावर चुंबनाची जबरदस्ती करीत होते.मी तेव्हा उभी होते.त्यांनी आपल्याला त्रास दिला असं या महिला पत्रकाराचे म्हणणे आहे.