अंमळनेर येथे पत्रकारावर प्राणघातक हल्ला
अंमळनेर येथील आयबीएन-लोकमत वाहिनीचे प्रतिनिधी सतीश गुलाबराव पाटील यांच्यावर आज मध्यरात्री अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला.रात्री साडेबाराच्या सुमारास पाटील यांना अज्ञान व्यक्तीचा फोन आला.निवडणुक आयोगाचे अधिकारी तपासणी करीत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितल्यानंतर सतीश पाटील स्वतःच्या गाडीने पाठक प्लाझा येथे गेले.तेव्हा त्यांना तेथे मोठा जमाव दिसला.सतीश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा जमाव आमदार शिरीष चौधरी यांच्या समर्थकांचा होता.तेथे जाऊन सतीश पाटील चित्रिकरण करीत असतानाच त्यांच्यावर हल्ला केला गेला.अंधार असल्याने हल्ला नेमका कोणी केला हे समजू शकले नाही.या प्रकरणाचा अंमळनेर येथील पत्रकारांनी निषेध केला असून आरोपीला लवकर अटक करावी यामागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.या हल्ल्यात पाटील यांच्या कॅमेर्याची आणि साहित्याची मोडतोड झाली आहे.या प्रकरणी पोलिसात त्रकार दिली गेली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे.