अंबाजोगाई पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

0
1088

मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई च्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा, 30 जानेवारीला वितरण

  आष्टीच्या सचीन पवार व परळीच्या प्रवीण फुटके यांना पुरस्कार जाहीर 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   मराठी पत्रकार परिषद, मुंबई शाखा अंबाजोगाई च्या वतीने “दर्पण दिन व मूकनायक दिन” सोहळ्याच्या निमित्याने देण्यात येणाऱ्या “स्व नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार” साठी आष्टी येथील दै पुण्यभूमीचे प्रतिनिधी सचीन पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर “स्व. मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै सकाळचे प्रतिनिधी प्रवीण फुटके यांची निवड करण्यात आली असुन या पुरस्काराचे वितरण 30 जानेवारी रविवार रोजी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.
     मराठी पत्रकार परिषद, मुंबई शाखा अंबाजोगाई च्या वतीने व “स्व. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कारा साठी बीड जिल्ह्यातून प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. प्राप्त प्रवेशिकांच्या अवलोकना नंतर परिक्षकांनी दिलेल्या निकाला नुसार या पुरस्कारा साठी आष्टी येथील दै पुण्यभूमीचे प्रतिनिधी सचीन पवार यांची “बोंबला यंदा ग्रेजव्युट पोरांनी घेतली उचल, म्हणे सतरंज्या उचलण्याचा हा परिणाम” या वृत्त्ता साठी निवड करण्यात आली असुन परिषदेच्या वतीने मागवण्यात आलेल्या प्रवेशिका मधूनच “स्व. मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात येत आले आहे. या पुरस्कारा साठी परळी वैजनाथ येथील दै सकाळचे प्रतिनिधी प्रवीण फुटके यांची “पतीच्या निधना नंतर समर्थपणे उद्योग सांभाळणारी दुर्गा” या वृत्त्ता साठी निवड करण्यात आली आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाचे उदघाटन

   30 जानेवारी रवीवार रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणाऱ्या “दर्पण दिन व मूकनायक दिन” सोहळ्या निमित्य आयोजित पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधूनच अंबाजोगाई शहरात “मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून सुशोभीत करण्यात आलेल्या “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कक्षाचे उदघाटन” ही मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होत आहे. 
   या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा एस एम देशमुख सर ( मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद ) उदघाटक म्हणुन आ. नमिताताई मुंदडा (केज विधानसभा सदस्य) प्रमुख वक्ते म्हणुन ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांची तर प्रमुख अतिथी म्हणुन राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई न प), रमेशराव आडसकर (चेअरमन, आंबासाखर), राजेसाहेब देशमुख (अ भा. काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष, अमर हबीब(जेष्ठ पत्रकार), आप्पासाहेब जाधव (शिवसेना बीड जिल्हा प्रमुख), डॉ भास्कर खैरे (अधिष्ठाता स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय), पो नि बाळासाहेब पवार (शहर पोलीस स्टेशन), पो. नि. वसुदेव मोरे (ग्रामीण पोलीस स्टेशन), ऍड शरद अण्णा लोमटे (अध्यक्ष वकील संघ व कायदेशीर सल्लागार म प परिषद), यांची उपस्थिती लाभणार असुन या प्रसंगी आपली उपस्थिती लाभणार असुन या कार्यक्रमात शहरातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे. कोरोना नियमास अधीन राहून कार्यक्रम होणार असल्याने सर्वाना मास्क बंधनकारक आहे अशी माहिती दत्तात्रय अंबेकर (बीड जिल्हा कार्याध्यक्ष म प परिषद), डॉ राजेश इंगोले (वैद्यकीय कक्ष प्रमुख) जेष्ठ पत्रकार राम कुलकर्णी, हनुमंत पोखरकर, एम एम कुलकर्णी, गजानन मुडेगावकर (अंबाजोगाई तालुका अध्यक्ष), नागेश औताडे, (तालुका कार्याध्यक्ष) विरेंद्र गुप्ता (सचिव), सतिश मोरे कार्यक्रम प्रमुख  गोविंद खरटमोल (प्रसिद्धी प्रमुख) यांच्या सह मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here