बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील दैनिक विविकसिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांना आमदार पृथ्वीराज साठे यांनी अवार्च्चा शिविगाळ करून धमक्या दिल्या आहेत.तुमच्या मुलाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्ही कसे वतर्मानपत्र चालवता ते बघतो अशीही धमकी त्यांनी गाठाळ यांना दिली आहे.विविकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजित गाठाळ यांनी निवडणूक निकालाचे विशलण करणारा एक लेख लिहिला होता.त्यात साठे यांच्यावर कसलीही व्यक्तीगत टीका केलेली नव्हती.तरीही त्यांनी धमक्या दिल्या आहेत.या प्रकरणी नानासाहेब गाठाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली असून विषय आर.आर.पाटील यांच्या कानी घालण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी समितीने केली आहे.