*पत्रकारासाठी आपत्कालीन निधी म्हणून 25 लाख रुपयांची तरतूद करावी, पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व पत्रकारांची घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याची पत्रकारांची मागणी*
*अंबाजोगाई* (प्रतिनिधी)
*नगरपरिषद फंडा मधून पत्रकारासाठी आपत्कालीन निधी म्हणून 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व पत्रकारांची घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी आदी मागण्या एका निवेदनाद्वारे मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न असलेल्या अंबाजोगाई पत्रकार संघ व अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने अंबाजोगाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना करण्यात आल्या आहेत*.
या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप, नगराध्यक्षा सौ. रचनाताई मोदी यांच्या सह उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी यांना दिलेल्या निवेदना मध्ये अंबाजोगाई शहरातील पत्रकारांनी म्हंटले आहे की, अंबाजोगाई शहर व तालुक्याच्या जडणघडणी मध्ये व विकासामध्ये येथील पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून पत्रकारांच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारावर कोणत्यावेळी काय प्रसंग उदभवेल हे सांगता येत नाही, आशा वेळी पत्रकारांना आर्थिक मदतीचा हात मिळावा या साठी अंबाजोगाई नगर पालिकेने ठराव घेऊन पत्रकारासाठी आपत्कालीन निधी म्हणून 25 लाख रुपयांची तरतूद करावी.
त्याच बरोबर गेली अनेक वर्षा पासून अंबाजोगाई तालुक्यातील पत्रकार बंधु पत्रकार भवनासाठी जागेची मागणी करत असून अद्याप पावेतो नगरपरिषदेने जागेची मागणी मान्य केलेली नाही त्या मुळे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथील ग्रामसभेत ज्या प्रमाणे पत्रकार व सैनिकांच्या घरपट्टी माफीचा ठरावं घेऊन पत्रकारांचा सन्मान केला आहे, त्याच धर्तीवर आंबाजोगाई नगर पालिकेनेही पत्रकारांच्या घरांचा घरपट्टी व नळपट्टी माफीचा ठराव घेऊन शहरातील पत्रकारांचा सन्मान करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न असलेल्या अंबाजोगाई पत्रकार संघ व अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर दत्तात्रय अंबेकर (बीड जिल्हा कार्याध्यक्ष) परमेश्वर गित्ते(जिल्हा सहसचिव) प्रदीप तरकसे (जिल्हा सहसंघटक) गजानन मुडेगावकर (निमंत्रक, हल्ला विरोधी कृती समिती),
प्रकाश लखेरा (अध्यक्ष अंबाजोगाई पत्रकार संघ), वीरेंद्र गुप्ता ( सचिव अंबाजोगाई पत्रकार संघ ), दादासाहेब कसबे (अध्यक्ष अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ),
गोविंद खरटमोल (सचिव अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ)
जेष्ठ पत्रकार अमर हबीब, नानासाहेब गाठाळ, राम कुलकर्णी,
अविनाश मुडेगावकर, प्रशांत बरदापुरकर, शिवकुमार निर्मळे,
रमाकांत पाटील, रवी मठपती,
जगन सरवदे, अभिजित गाठाळ
अभिजित गुप्ता, दत्तात्रय दमकोंडवार, रमाकांत उडानशिव, हनुमंत पोखरकर, राहुल देशपांडे,
रणजित डांगे, सलीम गवळी,
श्रावण चौधरी, संतोष बोबडे,
शंकर चव्हाण, मधुसूदन कुलकर्णी, रोहिदास हतागळे, नंदकुमार पांचाळ, सतीश मोरे, नागेश औताडे
बालाजी खैरमोडे, नागनाथ वारद
भाऊसाहेब गाठाळ, पूनम परदेशी
मारोती जोगदंड, मुशीर बाबा, जोगोजी साबणे, प्रशांत लाटकर, अशोक कदम, अशोक कचरे
विजय हमीने, जयराम लगसकर, संजय लोहिया, सखाराम सातपुते, उत्तम शिनगारे, स का पाटेकर, विश्वनाथ कांबळे, राम साबळे, अरुण गंगणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.