धुळ्यात डॉक्टरावर हल्ला झाला.वैद्यकीय क्षेत्रं भिती आणि भवितव्याच्या धास्तीन अस्वस्थ झालं.डॉक्टरांच्या संघटनांनी मोर्चे वगैरे काढले.मात्र समाज या घटनेकडं तटस्थ पहात राहिला.एकही राजकीय नेता बोलला नाही,एकाही सामाजिक संघटनेनं घटनेचा निषेध केला नाही,एकही पक्ष डॉक्टरांची बाजू घेण्यासाठी पुढं आला नाही.पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हाही नेमकं हेच होतं.वैद्यकीय व्यवसाय किंवा पत्रकारितेसाऱख्या कधी काळी पवित्र असलेल्या व्यवसायाबद्दलची समाजाची ही अलिप्तता नक्कीच समाजहिताची नाही.एखादया राजकीय व्यक्तीला कुणी थप्पड मारली,कुणी त्याच्या अंगावर शाई फेकली तर रस्त्यावर उतरणारा समाज डॉक्टर किंवा पत्रकारांसाठी हा आपलेपणा दाखवत नाही.( सगळे राजकारणी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं समजायचं का? ) यावर सतत पत्रकारांना पाण्यात पाहणारे काहीजण पत्रकारिता कशी बिघडली आहे वगैरे डोस पाजणार्या पोस्ट नक्की टाकतील पण सारेच बिघडले आहेत काय ? पत्रकारिता किंवा वैद्यकीय व्यवसायात एकही व्यक्ती चांगली नाही काय ? असेल तर मग त्या चांगल्या व्यक्तीचं चांगुलपण टिकवून ठेवण्यासाठी समाजानं त्याच्या पाठिशी उभं राहायला नको का ?. असं झालं नाही तर चांगुलपणावरचा उरला-सुरला विश्वासही संपुष्टात येईल.ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्याचं कोणीच समर्थन करणार नाही पण सत्तप्रवृत्ती वाढल्या पाहिजेत असं ज्यांना वाटतं अशांनी तरी त्यांची पाठराखण कऱण्याची गरज आहे.डॉक्टर बिघडलेत,पत्रकार हरामी आहेत असं म्हणून अशा घटनांकडं होणारं दुर्लक्ष हे अंतिमतःसमाजस्वास्थ्यासाठी नक्कीच घातक ठरणार आहे.धुळ्यातील घटनेचा आम्ही निषेध केलेला आहेच,अशा घटना परत घडणार नाहीत याची सरकारनं काळजी घेतली पाहिजे.डॉक्टारांसाठी असलेला संरक्षण कायदा अधिक कडक केला पाहिजे.